ऑक्टोबरमध्ये भारतात स्मार्टफोनच्या विक्रीत झाली 42% वाढ; ‘ही’ कंपनी आहे सर्वात आघाडीवर, जाणून व्हाल आश्चर्यचकित

दिल्ली :

ऑक्टोबरमध्ये भारतातील स्मार्टफोनची विक्री 42 टक्क्यांनी वाढून 2.1 कोटीची विक्री झाली. स्मार्टफोनच्या मासिक विक्रीच्या बाबतीत हा दुसरा सर्वात मोठा आकडा आहे.गुरुवारी ही माहिती देताना आयडीसी (IDC) या संशोधन कंपनीने सांगितले की, ऑक्टोबरमध्ये अनेक ऑनलाइन विक्री महोत्सवामुळे स्मार्टफोन बाजारात वाढ झाली आहे. आयडीसीने म्हटले आहे की संपूर्ण २०२० सालच्या विक्रीची आकडेवारी मागील वर्षाच्या तुलनेत कमी असेल.

आयडीसीने सांगितले की, ऑक्टोबर महिन्याच्या स्मार्टफोन विक्रीत सणासुदीच्या हंगामाच्या ऑनलाइन विक्रीचा मोठा वाटा होता. या व्यतिरिक्त, 2020 च्या तिसर्‍या तिमाहीच्या जोरदार मागणीचे देखील योगदान आहे. ऑक्टोबरमध्ये स्मार्टफोन विक्रीची ही सर्वाधिक नोंद आहे. मासिक आधारावर स्मार्टफोन विक्रीची ही सर्वात जास्त संख्या आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये स्मार्टफोनची विक्री 23 कोटी युनिट्सची विक्री झाली होती. ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्मार्टफोन विक्रीच्या 51 टक्के हिस्सा होता. ऑनलाईन विक्रीत वार्षिक आधारावर 53 टक्के वाढ झाली आहे.

ऑक्टोबरमध्ये शाओमीचा (Xiaomi) स्मार्टफोन बाजारात 24.8 टक्के सर्वाधिक हिस्सा होता. या कंपनीने बाजी मारत सर्वात जास्त फोनची विक्री केली. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या सॅमसंगची 20.6 टक्के भागीदारी आहे. विवोचा बाजाराचा वाटा 17.8 टक्के, रियलमीचा 13.8 टक्के आणि ओप्पोचा 12.3 टक्के होता.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here