फ्रिजमध्येही खराब होऊ शकतात ‘हे’ पदार्थ; वाचा कोणते ते

काही नाही होत राहूदे फ्रीजमध्ये असे म्हणत आपण आपल्या आरोग्याला धोका निर्माण करत असतो. फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे खाद्यपदार्थांना काहीच होत नाही हा आपला समाज आता खोटा ठरत आहे. कारण एखादा पदार्थ एका विशिष्ठ काळापुरता नीट राहू शकतो नंतर तो खराब होतो.

जाणून घेऊया अशा खाद्यपदार्थांविषयी :

1) नॉनव्हेज :-
काही लोकांच्या घरी असा प्रॉब्लेम असतो की नॉनव्हेज खाणारे कमी लोक असतात मग आणताना माणसे किमान एक किलो तरी आणतात. अशा वेळी लोक बनवुन खातात व मग आपल्या सवडीने पुन्हा गरम करून खातात. जर नॉनव्हेज फ्रीजमध्ये ठेऊन खात असाल तर ते तुमच्या आरोग्यसाठी हानिकारक आहे. जे काही बनवले आहे ते त्याच दिवशी खाऊन फस्त करा. एक दिवसापेक्षा जास्त काळ नॉनव्हेज फ्रीजमध्ये ठेऊ नये. तसेच कच्चे मांस सुद्धा जास्त काळ फ्रिजमध्ये ठेऊ नये.

2) लोणी :-
लोणी हे साधारणपणे 12-14 दिवस फ्रीजमध्ये ठेवावे. त्यापेक्षा जास्त काळ ठेऊ नये. आणि लोण्याचा वापर करण्यापूर्वी ते 15-20 मिनिटे आधी फ्रिजमधून काढावे व मग वापरावे.

3) दूध :-
दुधात बॅक्टेरिया वाढण्याचे प्रमाण जास्त असते. दुधाबाबत सर्वात जास्त काळजी घ्यावी. फ्रिजमधून गरजेपुरते दूध एका भांड्यात घ्या. आधीचे भांडे तातडीने आतमध्ये ठेवा.

4) अंडी :-
अंडी ही सर्वाधिक काळ फ्रिजमध्ये व्यवस्थित राहतात. जवळपास महिनाभर अंडी फ्रीजमध्ये राहिली तरी काहीच समस्या होत नाही. पण पाच आठवड्यांपेक्षा अधिक काळ अंडी फ्रीजमध्ये ठेऊ नये.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here