जखमेचे काळे डाग घालवायचेत; वाचा ‘हे’ घरगुती उपाय

आपल्यापैकी अनेकांना लहानपणी खेळताना, शाळेत धिंगाणा, मस्ती करताना जखमा झालेल्या असतात. त्या जखमांचे व्रण किंवा डाग आजवर आपल्या शरीरावरच्या कुठल्याही भागात असतात. हे डाग घालवण्यासाठी आपण डॉक्टरकडे जातो कधी कधी चेहऱ्यावर जखमांचे डाग असतील तर ब्युटी पार्लरमध्ये जातो.

अजूनही आपल्या शरीरावर जखमांचे काळे डाग असतील ‘हे’ आहेत उपाय :-

  • साध्या पाण्याने जखमेचा भाग धुवून घ्या. त्यावर ओला आणि स्वच्छ कपडा ठेवा. काही तासाने ताज्या लिंबाच्या रसात बुडवलेले कापड या जखमेवर ठेवा. त्वचा सुकल्यानंतर तुम्ही त्यावर टोमॅटोचा रसही लावू शकता. असे दिवसातून दोन वेळा केल्यास जखमेचा डाग कमी होण्यास मदत होईल.
  • दिवसातून दोनदा बदामाचं तेल जखमेवर लावून हलका मसाज करावा.
  • मेथीचे दाणे रात्रभर भिजवून सकाळी त्याची पेस्ट बनवा. तयार पेस्ट जखमेवर लावा व पूर्ण सुकल्यावर थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
  • स्वच्छ धुवून घेतलेली बटाट्याची साल काढून ती जखमेवर लावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here