युवा नेते, भाऊ, दादा, म्हणवून घ्यायचे आहे तर ‘या’ गोष्टी आहेत गरजेच्या; वाचा की युवा नेत्यांनो

आजकाल भावी नेते, भावी आमदार अशा भावी आणि युवा नेत्यांची क्रेझ आहे. ‘खायला नाही दाना आणि बाजीराव म्हणा’ अशी गत आपल्याकडच्या युवा नेत्यांची असते. युवा नेत्याचा साचा तयार व्हायला काही गोष्टी गरजेच्या असतात. हा साचा तयार करण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्यासोबत २-४ वाकडी तिकडी कटिंग- दाढी केलेली पोरं लागत्यात. पोरं असतील तरच तुम्ही ‘भावी नेते नाहीतर माती खाते’.

‘या’ गोष्टी असतील तरच तुम्ही बनू शकता युवा नेते :-

१) भाषण नाही, समाजकार्यही नाही. तुमच्या पाठीमागे पोरं असतील तर वर्षभर बाकी काही नाही केलं तरी चालत पण गल्लीतल्या पोरांचे बड्डे साजरे करनं गरजेचं आहे भाऊ.आणि चौकात बड्डेचा फ्लेक्स लावण्याएवढे पैसे नसतील तर फेसबुकवर बड्डे पोस्ट टाकणेही गरजेचं आहे.

२) तुम्ही खा किंवा नका खाऊ पण कार्यकर्त्यांसाठी खिशात मावा आणि तंबाखू हवीच.

३) पायात एकतर लोफर शूज नाहीतर डूब्लीकेट कोल्हापुरी चप्पल हवीच.

४) नगरसेवक, सरपंच, संघटना अध्यक्ष, आमदार यांच्यापैकी एका जनासोबत तरी फोटो असायला पाहिजे.

५) एखाद्या चहा आणि पान टपरीवर उधारी खाते.

६) बुलेट नाहीतर यामाहा गाडी लागायची पण आजकाल access वर भागून घेतात.

७) रस्त्यावरचा १०० रुपयाचा branded गॉगल (सोनेरी काड्या आणि काळ्या काचा)

८) फेसबुक आणि इन्स्टाग्राम असलेला मोठा मोबाईल

९) दोनशे रु.चा व्हाईट लिनन शर्ट अन पॅन्ट (शर्टच्या खिशात बाहेरून दिसेल अशी शंभरची एक नोट असावी व आतून दहा-दहा च्या नोटा असाव्यात)

१०) खिशाला पेन हवा. भलेही स्वतःला लिहायची अक्कल नसेल पण पेन हवाच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here