सरकारी नोकरीची सुवर्णसंधी : 12वी पास असणार्‍यांनी करा अर्ज; फक्त 2 दिवस शिल्लक

दिल्ली :

सध्या जगभरात लोकांवर आर्थिक संकट आलेले आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तसेच अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात झाली आहे. उद्योग–धंदे करणारे छोटमोठे व्यावसायिकही अडचणीत आहेत. एकूण जगभरात अशी परिस्थिती असताना केंद्र सरकारने एक मोठी सुवर्णसंधी आणली आहे.

12 वी पास झालेल्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महत्वाचे म्हणजे अर्ज करण्यासाठी शेवटची संधी आहे.

या पदांसाठी होतेय भरती :-
SSC द्वारा परिक्षेद्वारे भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे.

  • लोअर डिव्हिजन क्लार्क (LDC)
  • ज्युनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट
  • पोस्टल असिस्टंट
  • डाटा एंट्री ऑपरेटर्स

अशा आहेत अटी :-

  • देशातील कोणत्याही बोर्डातून बारावी (10+2) उत्तीर्ण झालेले युवक या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
    • महिला उमेदवार, दिव्यांग, एससी, एसटी आणि माजी कर्मचाऱ्यांसाठी अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. तर अन्य उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
    • उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे असावे. आरक्षित वर्गासाठी 15 वर्षांची सूट दिली जाईल. ती 27+15 अशी असेल.

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – 6 नोव्हेंबर 2020
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)
ऑनलाईन फी पेमेंटची अंतिम तारीख – 21 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)
ऑफलाईन चलन अंतिम तारीख – 24 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)
चलनसाठी फी पे करण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर

परिक्षा
कॉम्प्युटरवरील परिक्षा 1 – 12 एप्रिल 2021 ते 27 एप्रिल 2021
परिक्षा दुसरी – नंतर घोषित केली जाईल.


1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here