पोळी/चपातीवर तूप लावून खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे; वाचून व्हाल आश्चर्यचकित

शहरी भागात पोळी तर ग्रामीण भागात चपाती म्हणतात, एवढंच काय तो फरक.. बाकी चवीला सेम, दिसायला सेम. फक्त जीवनशैली आणि संस्कृतीमधील बदल पदार्थांचेही नाव बदलत असतो. त्यामुळे घोळ करू नका. दोन्हीही एकच आहे. फक्त आता एकच करा. गरमागरम चपातीवर तूप लावून खा. अहो का म्हणून काय विचारता.. फायदे वाचा की.

१) तुमच्या रक्तातील आणि आतड्यांमधील कोलेस्ट्रॉल तुपामुळे कमी होतं कारण यामध्ये बायलरी लिपीडचा स्राव वाढवण्याची क्षमता असते. जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल घटवण्यासाठी उपयोगी ठरतं. तसंच यामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल वाढून तुमचं आरोग्य चांगलं राखण्यास फायदेशीर ठरतं. म्हणून रोज तुम्ही जी पोळी खाता त्यावर तूप लावून खा.

२) पोळी आणि तूप एकत्र खाल्ल्याने रक्तातील सेलमध्ये जमा असलेलं कॅल्शियम कमी होतं आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. तसंच तुमची प्रतिकारशक्तीदेखील यामुळे वाढते.

३) तुम्हाला जर कोणत्याही प्रकारे हृदयाशी संबंधित त्रास असेल तुम्ही नियमित पोळी तूप नक्कीच खायला हवं. कारण ल्युब्रिकंटप्रमाणे ब्लॉकेज रोखण्याचं काम तूप पोळी करते.

४) मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी पण लक्षात घ्यायला हवे की पोळी आणि तुपाच्या या असलेल्या कॉम्बिनेशनमध्ये सीएलए हे इन्शुलिनची मात्रा कमी करण्यासाठी मदत करतं. इतकंच नाही तर या कॉम्बिनेशनमधील ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतं आणि त्यामुळे रक्तात लगेच साखर मिसळू देत नाही आणि पोटदेखील बराच वेळ भरलेलं राहातं.

५) तुपामध्ये आढळणाऱ्या गुणांमुळे तुमचं वजन कमी करण्यसाठी मदत होते. तसंच तुपामुळे तुमच्या हृदयावर कोणत्याही प्रकारचा दबाव येत नाही. त्यामुळे आरोग्याचीही काळजी घेतली जाते.

हे करताना तूप आणि पोळी योग्य प्रमाणात खायला हवी. एक पोळीसाठी फक्त एकच चमचा तूप घ्या.

संपादन : संचिता  कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here