दिल्ली :
चीन भारत तणावाच्या पार्श्वभूमीवर आजवर भारताने चीनला अनेक झटके दिले. त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. याआधी केंद्र सरकारने दोनशेहून अधिक चायनीज अॅप्सवर बंदी घातली होती. यात टिकटॉक सारख्या प्रसिद्ध अॅपचा समावेश होता. केंद्र सरकारने केलेल्या या डिजिटल स्ट्राईकमुळे चीनचा जळफळाट झाला होता. आता भारताने चीनला अजून एक जोरदार झटका दिला आहे.
आघाडीची आणि मोबाइल क्षेत्रात नावाजलेली दक्षिण कोरियाची स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंगने चीनशी फारकत घेतली आहे. चीनमध्ये असलेली आपली डिस्प्ले फॅक्ट्री सॅमसंगने भारतात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. ही फॅक्ट्री नोएडात तयार करण्यात येणार आहे. कंपनी यासाठी ४८२५ कोटींची गुंतवणूक करणार आहे. भारत जगातील तिसरा असा देश आहे. ज्या ठिकाणी अशाप्रकारची युनिट असणार आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे पाकिस्तानमध्ये टिकटाॅकवर बंदी घातली. टिकटाॅवर बंदी घालण्यापूर्वी पाकिस्तानने टिकटाॅक अनेक पूर्वसूचना दिल्या होत्या. मात्र टिकटाॅकने त्या सूचनांना गांभीर्याने ने घेतल्याने पाकिस्तान सरकारने हे पाऊल उचलले आहे.
संपादन : स्वप्नील पवार
- म्हणून शेतकरी-सरकार बैठक ठोस निर्णयाविनाच संपली; पहा नेमके काय झालेय
- आले की अच्छे दिन; प्रत्येकाला मिळणार 1 लाख रुपये, पहा कोणी घेतलाय जनहिताचा निर्णय
- भाजीपाला मार्केट अपडेट : एकाच क्लिकवर पहा पालक, शेपू, कोथिंबीर, मेथीसह पातीचे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा सोलापूर, पारनेरला किती भाव खातोय कांदा
- मुंबई बाजारभाव : पहा एकाच क्लिकवर संपूर्ण पिकांचे मार्केट अपडेट