अहमदनगर :
‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप खासदार सुजय विखे पाटील हे सहभागी झाले होते. यावेळी अनेक धम्माल गोष्टी समोर आल्या. यावेळी ‘पंकजा मुंडे किंवा रोहित पवार यांनी नेतृत्व केलं तरी आम्ही ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहोत. आमचं काही म्हणणं नाही. कुणीही नेतृत्व करा पण पक्षाच्या पलीकडे जावून चांगल्या विचारांनी काम करुया’, असे मत विखे यांनी मांडले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, रोहित पवार, पंकजा मुंडे यांच्या शिक्षण संस्था आहेत, आम्ही जर सर्व एकत्र आलो तर ऊसतोड कामगारांसाठी चांगलं काम होईल. सर्वांनी मिळून राजकीय पक्ष बाजूला ठेवून मनापासून हे करायला हवं.
यावेळी विखे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘पंकजा ताईंचा आणि आमचा जिल्हा मुळात ऊसतोड कामगारांचा उगम आहे. ऊसतोड कामगारांचा प्रश्न महाराष्ट्रासमोर आणण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं. त्यांच्याबरोबर माझे आजोबाही त्या प्रक्रियेत होते. खरंतर त्यांच्यामुळेच कामगारांच्या या अडचणीदेखील आहेत ते समोर आलं. रोहित पवार, पंकजा मुंडे यांनी देखील मत मांडलं. त्यांनी पुढाकार घेऊन नेतृत्व केलं तर आमचा त्यांना पाठिंबा आहेच. कारण त्यांनी त्या गोष्टी फार जवळून पाहिल्या आहेत’, असेही विखे यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. या कार्यक्रमात अभिनेता सागर कारंडे यांनी ऊसतोड कामगारांची बाजू मांडणारं भावनिक पत्र सर्वांसमोर वाचून दाखवलं. या पत्रावर तीनही नेत्यांनी खूप मार्मिक अशी प्रतिक्रिया दिली.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- ना भाजप, ना महाविकास आघाडी; ‘या’ मंत्र्यांच्या पॅनलने सगळ्यांनाच चारली धूळ
- आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत ‘या’ माजी उपमुख्यमंत्र्यांना धक्का; बारामतीकरांचे बारीक लक्ष भोवणार
- तृतीयपंथी असल्याने अर्ज नाकारलेल्या अंजली पाटलांचा निकाल आला समोर; वाचा, काय आहे निकाल
- अण्णांच्या राळेगणसिद्धीत घडला ‘हा’ प्रकार; ‘त्यांनी’ मारली बाजी
- महाविकास आघाडीतील तीनही पक्ष ‘या’ ग्रामपंचायतीसाठी आपसात भिडले; मात्र घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार