मुंबई :
तरुणांना सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय रेल्वे अनेक विभागांमधील अॅक्ट अॅप्रेंटीस पदावर थेट भरती करणार आहे. रेल्वे भरती कक्षाने (आरआरसी) याबाबत अधिसूचना जारी केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे यासाठी कोणत्याही परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. थेट भरती केली जाणार आहे.
या रिक्त पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आरआरसीच्या (रेल्वे रिक्रूटमेंट सेल) वेबसाइटवर सुरू झाली आहे.
पोस्ट नाव – एक्ट अप्रेंसिटस
पदांची संख्या – 1004
असे आहेत पदावाईस संख्या :-
हुबली डिवीजन – 287
कैरेज रिपेयर वर्कशॉप, हुबली – 217
बंगलुरू डिवीजन – 280
मैसूर डिवीजन – 177
सेंट्रल वर्कशॉप, मैसूर – 43
अशा आहेत अटी :-
- देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार, ज्यांनी संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र अभ्यासक्रम केला आहे, ते या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
- अर्जदाराचे किमान वय 15 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षे असावे.
- आरक्षित वर्गासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा शिथिल करण्यात येईल.
असा करा अर्ज :-
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 10 डिसेंबर 2020
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 09 जानेवारी 2021
अर्ज फी: – सर्वसाधारण, ओबीसी उमेदवारांना 100 रुपये अर्ज फी भरावी लागेल. एससी, एसटी, दिव्यांग आणि महिलांसाठी अर्ज विनामूल्य आहे.
- राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती
- खुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस
- राज्यातील ‘या’ शहरात घडली घटना : लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास; थेट आयसीयूमध्ये केले दाखल
- आता काँग्रेसही झाली आक्रमक; ‘मांडीला मांडी लावून बसलेले’ म्हणत ‘त्यांच्यावर’ साधला निशाणा
- आता घराचे स्वप्न होणार साकार; ‘या’ बँका देत आहेत सर्वात स्वस्त लोन