लॉकडाऊननंतर ‘या’ व्यवसायात आहे सर्वात मोठी संधी; नक्कीच वाचा

कोरोना आला आणि आपली सगळी वाट लावून गेला. पण तसं नसून कोरोना आला पण आपल्याला नवीन वाट दाखवून गेला असं म्हणणं गरजेचं आहे. तर मित्रो. तुमको कमी पैशावाली बिजनेस आयडिया चाहीये की नई चाहीये.

यावेळी तुम्हाला एक भन्नाट आयडिया सांगणार आहोत. ती पण कमी खर्चांत चांगले पैसे मिळवून देणारी. करोना व्हायरसमुळे लोक स्वतःची जास्तीत जास्त काळजी घेत आहेत. म्हणजे अगदी बाहेर किराणा आणायला गेल्यावर आपल्या गाडीला कुणी हात लावू नये म्हणून कुठे तरी एका कोपऱ्यात गाडी लावणारे लोक दिसत आहेत. बिल्डींगमध्येही लोकांच्या गाडी कमी संपर्कात येईल, अशी जागा निवडण्यासाठी लोक प्रयत्न करत आहेत. घराबाहेर असणाऱ्या जेवढ्या काही गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सॅनिटाइझ करणे महत्वाचे आहे.

आता अनेक लोकांना आपल्या बिल्डिंग, गाड्या आणि इतर गोष्टी सॅनिटाइझ करायच्या आहेत. पण त्यासाठी योग्य लोक मिळत नाहीयेत. सध्या अनेक ठिकाणी रस्ते, रेल्वे स्टेशन, ट्रेन, कार, ऑटो रिक्षा आणि घरांचं सॅनिटायझेशन केलं जात आहे. ही एक मोठी संधी आहे. सर्व सार्वजनिक जागा वेळोवेळी सॅनिटायझ केल्या जात आहेत.

तुम्ही एवढे सगळे न करता एकच काहीतरी लाईन पकडणे गरजेचे आहे. म्हणजे

  • आपल्या भागातील दहा बिल्डींग व तेथील गाड्या.
  • एखादी मोठी कंपनी.
  • शहरातील खाजगी ऑफिसेस.
  • शाळा.
  • क्लासेस किंवा एखादे भाजी मार्केट.

हे सर्वच सॅनिटाईज करणे महत्वाचे आहे. खाजगी ऑफिसला तर सॅनिटाईज करणे, बंधनकारक केले आहे. शाळा, क्लासेसला ते बंधनकारक होऊ शकते.

असा सुरु करा व्यवसाय :-

सध्या सॅनिटाईज करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक मशीन्स उपलब्ध आहेत. काही हाताने वापरायचे आहेत तर काही ऑटोमॅटिक आहेत. तुमच्या बजेटमधील तसेच तुम्हाला व्यवसाय मिळवून देऊ शकते अशी मशीन विकत घ्या. किंवा मोठा स्प्रेच्या माध्यमातून तुम्ही हे सॅनिटाईज करण्याचे काम सुरु करू शकता.

असा आहे फायदा :- दुचाकी सॅनिटाइझ करण्यासाठी जवळपास १५ मिनिटं लागतात. एका दुचाकीसाठी तुम्ही महिन्याचे किंवा आठवड्याचे पॅकेज देऊ शकता. एक वेळी दुचाकी सॅनिटाइझ करण्यासाठी जवळपास २०० रुपये घेतले जातात. तुम्ही तुमच्या भागानुसार, संधीनुसार आणि लोकांच्या खर्च करण्याच्या तयारीनुसार पैसे ठरवू शकता.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here