मुंबई :
देशात कोरोनाव्हायरसची एकूण प्रकरणे 99 लाखांपलीकडे गेली आहेत. कोरोना लसीकरण करण्यासाठी देशभरात तयारी सुरू आहे. दरम्यान, एक मोठा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई येथे गटाराच्या पाण्यात कोरोनाव्हायरस सापडला आहे. धारावीसह मुंबईच्या 6 वॉर्डांतून गटाराचे पाणी गोळा करण्यात आले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) केलेल्या प्राथमिक अभ्यासानुसार मुंबईतील गटारातील पाण्यात कोरोनाव्हायरस आढळला. हे नमुने 11 मे ते 22 मे दरम्यान घेण्यात आले होते.
सहा प्रभागांतून घेण्यात आलेले सर्व नमुने पॉजिटिव आढळले आहेत तर 16 मार्चपूर्वी घेतलेले सर्व नमुने निगेटिव असल्याचे आढळून आले. हे नमुने वडाळा, धारावी, कुर्ला, शिवाजी नगर, मालाड आणि कांजूर येथून घेण्यात आले. नवीन विषाणूमुळे त्याचे सर्व पैलू तपासले जात आहेत. आतापर्यंत हे देखील समजले गेले आहे की कोरोना संक्रमित रूग्णांच्या विष्ठेतही व्हायरस आहे. सुरुवातीला, सीवर वॉटरमध्येही कोरोना व्हायरस असण्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर अभ्यास सुरू करण्यात आला. प्राथमिक अभ्यासात समोर आलेल्या माहीतीनुसार कोरोनाव्हायरस गटारांच्या पाण्यातदेखील टिकू शकतो.
आता सफाई कर्मचारीही या माहितीमुळे भयभीत झाले आहेत. दरम्यान आता जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना लस लोकांना दिली जात आहे. भारतातही कोरोना लसीकरण लवकरच सुरू होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत ‘या’ माजी उपमुख्यमंत्र्यांना धक्का; बारामतीकरांचे बारीक लक्ष भोवणार
- तृतीयपंथी असल्याने अर्ज नाकारलेल्या अंजली पाटलांचा निकाल आला समोर; वाचा, काय आहे निकाल
- अण्णांच्या राळेगणसिद्धीत घडला ‘हा’ प्रकार; ‘त्यांनी’ मारली बाजी
- महाविकास आघाडीतील तीनही पक्ष ‘या’ ग्रामपंचायतीसाठी आपसात भिडले; मात्र घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार
- आमदार मामाला गावातून झटका; माजी आमदार भाचीने केले ‘असे’ परिवर्तन