सावधान… ‘त्या’ बड्या कंपनीच्या नावाने विकल जात होतं बनावट खत; ‘असा’ झाला पर्दाफाश

नांदेड :

आजवर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बनावट कीटकनाशके, खते आणि बियाण्यांची विक्री झाल्याच्या अनेक घटना आपल्या समोर आल्या आहेत. तद्दन आणि पूर्णपणे बनावट असणार्‍या वस्तु आणि प्रॉडक्टस आपल्याला खरे भासवले जातात. हे पटवून दिलं जातं आणि लाखोंचा गंडा घातला जातो. नांदेडमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आयपीएल या बड्या कंपनीचे पोटॅश खत असल्याचे सांगत मोठ्या प्रमाणात बोगस खताचा पुरवठा नांदेड आणि परिसरात केला जात होतं. दरम्यान या पोटॅश खताची तपासणी केली गेली. त्यानंतर औरंगाबाद येथील खत निरिक्षण प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात स्पष्ट झाले की, सदर खताच्या बॅगमध्ये शून्य टक्केही पोटॅश नसल्याचे उघड झाले.        

नंतर या बनावट खत प्रकारणात सामील असलेल्या सात जणांविरुद्ध लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोघांना अटकही करण्यात आली आहे. या खताची वाहतूक करत असताना बोगस पोटॅश खताच्या बॅगा जप्त करण्यात आल्या. तसेच बोगस पोटॅश खताच्या १६०० बॅगा विक्री केली असल्याचीही माहितीही आरोपींनी दिली आहे.

यापूर्वीही अशा घटना अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र किरकोळ कारवाईमुळे असे गुन्हे पुन्हा पुन्हा घडत आहेत. अशावेळी कृषी विभाग काय आणि कशा प्रकारे कारवाई करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here