सरकारी नोकरीची सुवर्णसंधी : ‘या’ क्षेत्रात 1 लाख 40 हजार जागांसाठी मेगाभरती; आजपासून भरती प्रक्रियेला सुरुवात

मुंबई :

सध्या जगभरात लोकांवर आर्थिक संकट आलेले आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तसेच अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात झाली आहे. उद्योग–धंदे करणारे छोटमोठे व्यावसायिकही अडचणीत आहेत. एकूण जगभरात अशी परिस्थिती असताना नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय रेल्वेकडून 1 लाख 40 हजार पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

तीन टप्प्यांत ही भरती प्रक्रिया पार पडेल. आजपासून या प्रक्रियेला प्रारंभ होईल. रेल्वे विभागाने 11 डिसेंबरला प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार तब्बल सव्वा लाख पदांसाठी 2.44 लाख उमेदवार इच्छूक आहेत, अशी माहिती रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून मिळाली आहे.

अशी आहे प्रोसेस :-

आजपासून या भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरु होईल. 15 ते 18 डिसेंबर या कालावधीत उमेदवारांची लेखी परीक्षा होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) पदांसाठी 28 डिसेंबर ते मार्च 2021 या काळात परीक्षा होतील.

तर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात पहिल्या श्रेणीतील (CEN No. RRC- 01/2019) पदांसाठीची परीक्षा पार पडेल. या परीक्षेचा कालावधी साधारण एप्रिल 2021 ते जून 2021 असा असेल.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here