निवडणुकीत भाजपला मोठा झटका; मात्र, काँग्रेसलाही मतदारांनी दाखवली जागा..!

सध्या देशभरात भाजपचा विजयाचा वारू चौखूर उधळत असतानाच राजस्थानी मतदारांनी या पक्षाला मोठा झटका दिला आहे. अशावेळी राज्यातील सत्ताधारी काँग्रेस पक्षालाही याचा थेट फायदा झालेला नाही. कारण, मतदारांनी थेट अपक्षांना ताकद दिली आहे.

12 जिल्ह्यांतील 50 महापालिका निवडणुकीसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्याची मोजणी आता सुरू झालेली आहे. मात्र, त्यात बहुसंख्य ठिकाणी जुने सत्ताधारी असलेल्या भाजपला मोठा झटका सहन करावा लागला आहे. काँग्रेस पक्षासाठी निकाल सुखद आहेत.

मात्र, त्याचवेळी अनेक ठिकाणी खऱ्या अर्थांने किंगमेकर बनले आहेत अपक्ष नगरसेवक. होय, मतदारांनी त्यांना भरभरून मतदान केले आहे. त्यामुळे त्रिशंकू स्थितीत अपक्षांना अच्छे दिन आलेले आहेत. 1775 वार्डातील निवडणुकीत कॉंग्रेसचे 620, भाजपचे 548 आणि धक्कादायक म्हणजे 595 अपक्ष नगरसेवक निवडून आलेले आहेत.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here