पाकिस्तान जिंदाबाद व मोदी विरोधाचा ‘तो’ व्हिडिओ खोटाच; शेतकरी आंदोलनास बदनाम करण्यासाठी वापर

दिल्लीतील आंदोलक शेतकरी हे पाकिस्तान व चीन यांच्या मदतीने आंदोलन करीत आहेत. किंवा तिथे पाकिस्तान जिंदाबाद, खलिस्तान की जय, दहशतवाद्यांना सोडा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील घोषणाबाजी सुरू असल्याचे दावे करणारे व्हिडिओ आणि फोटो सध्या जोरात शेअर केले जात आहेत. मात्र, असे व्हिडिओ आणि त्यावर आधारित फोटो खोटे असल्याचे atl news यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे.

Haider Warraich on Twitter: “Massive Crowd outside United Nations, #Kashmir was indeed raised in NewYork. 10 to12 thousand people. @MysticIntel @SdqJaan @kmaliikk #UNGA2019 #ImranKhanVoiceOfKashmir #ImranKhan @PTIofficial @ImranKhanPTI @Natsecjeff @XULQIMOON @5hoab @ARYNEWSOFFICIAL @KlasraRauf @AmirMateen2 https://t.co/rU7ZFrpL7f” / Twitter

www.altnews.in/hindi/ यांच्याकडून जगभरातील खोट्या बातम्या आणि राजकीयदृष्ट्या अफवा पसरवणाऱ्या फोटो व व्हिडिओ यांची खातरजमा करून बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. त्यांनी शेतकरी आंदोलनाशी जुने परदेशातील व्हिडिओ व फोटोज जोडून शेतकरी आंदोलनास बदनाम केले जात असल्याचे पुराव्यासह दाखवून दिले आहे. संबंधित व्हिडिओमध्ये छेडछाड केल्याचे स्पष्ट दिसत आहे. अमेरिका व युरोपातील जुने व्हिडिओ आताच्या शीख शेतकऱ्यांचे असल्याचे भासवून आंदोलनात फुट पडण्याचे निष्फळ प्रयत्न याद्वारे केले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

‘किसान प्रदर्शनों के बीच तारिक फ़तह, ऑप इंडिया 2019 का देश विरोधी नारों का वीडियो सामने लाये’ या बातमीत ऑल्ट न्यूजने म्हटले आहे की, किमान एक वर्षांपूर्वी जुने असे व्हिडिओ आणि फोटो घेऊन तेच दिल्लीतील आंदोलनाचे असल्याचे दाखवले जात आहे. सध्या शेअर होत असलेले आणि बातम्यांमध्ये झळकत असलेले फोटो व व्हिडिओ हे 29 सप्टेंबर 2019 रोजीचे आहेत. ज्यावेळी पंतप्रधान मोदी अमेरिकेत होते. त्यावेळी त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यासाठी आणि काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनाचे दावे करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी न्युयॉर्क शहरात संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बाहेर निदर्शने केली होती.

(3) Siasat.pk on Twitter: “امریکا میں سکھوں نے عمران خان زندہ باد، پنجاب بنے گا خالصتان اور کشمیر بنے گا پاکستان کے نعرے #Sikhs #Punjab #Khalistan #PMIK #Kashmir https://t.co/bLBdgQulZS” / Twitter

त्याच व्हिडिओच्या आधाराने पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि राजस्थान येथील शेतकरी आंदोलकांना पाकिस्तानी, चीनी, खलिस्तानी आणि देशद्रोही ठरवण्याचे प्रयत्न होत आहेत. मुळात अनेकांनी बातम्या करून नंतर या बातम्या डिलीट केल्या आहेत. मात्र, आंदोलकांना बदनाम करण्याचा आणि फुट पडण्याचा डाव यानिमित्ताने यशस्वी झालेला आहे. दुर्दैवाने त्यामुळे शेतकरीच आता देशद्रोही म्हणून टीकेचे धनी ठरत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे व्हिडिओ आणि याच्या बोगस बातम्या जोरदार शेअर केल्या आहेत.

ता. क. : मूळ बातमी आणि इतर पुरावे यांच्या माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करून अधिक माहिती घ्यावी.

किसान प्रदर्शनों के बीच तारिक फ़तह, ऑप इंडिया 2019 का देश विरोधी नारों का वीडियो सामने लाये – Alt News

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here