‘त्या’ घोळामुळे वाढली रंगत; पहा काय होईल ग्रामपंचायत निवडणुकीत

ग्रामपंचायत ही लोकशाहीचा पाया असली तरीही ही निवडणूक कोणालाही सोपी नसते. भल्याभल्या.. मी..मी.. म्हणणाऱ्यांना ही निवडणूक जागा दाखवून देते. त्यातच यंदा तर सरपंच कोणासाठी राखीव असेल हेच गुलदस्त्यात असल्याने सगळेच सरपंच पदासाठी दावे तोडीत निवडणूक लढवणार असल्याने रंगत वाढली आहे.

यंदा प्रथमच निवडणूक मतदान झाल्यावर सरपंच पदासाठीचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे सगळेच एका अर्थाने सरपंच पदासाठी दावेदारी करून रिंगणात उतरणार आहेत. याबाबत सामाजिक-राजकीय क्षेत्रातील भाष्यकार प्रवीण अनभुले यांनी म्हटले आहे की, जाहीर झालेली ग्रामपंचायत निवडणुक म्हणजे मुलाला मुलगी न दाखवताच बोहल्यावर चढवण्या सारखी आहे.सरपंच पदाचे आरक्षण जाहीर न करताच सदस्य निवड आणी त्याच्यात पॅनेल बंदी. भावी सरपंचासाठी ही निवडणुक म्हणजे तारेवरची कसरत आहे.

त्यांनी ही प्रातिनिधिक भावना व्यक्त केली आहे. कारण, यंदा पद कोणाला मिळू शकेल याची खात्री नसल्याने खर्च कोणी करायचा यवरही तोडगा निघणे शक्य नाही. परिणामी आपापल्या पद्धतीने निवडणूक लढणाऱ्या सर्वांना मग निकाल लागल्यावर भाववाढीची मोठी संधी असेल. त्यामुळे निकालात धक्का बसण्यासह पदाच्या निवडीतही वेगळा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here