गुड न्यूज : 400 रुपयात SUV, कार आणि इतर बक्षिसे जिंकण्याची संधी; पहा तुमच्याकडे कुठे सुरू आहे ही स्कीम

सध्या पेट्रोलचे मूळ भाव कमी आणि सरकारी कर जास्त अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे पेट्रोल आता थेट शंभरी गाठण्याच्या तयारीत आहे. अशावेळी इंडियन ऑईल कंपनीने ग्राहकांसाठी खास स्कीम लागू केली आहे. ज्याद्वारे ग्राहकांना थेट SUV कार जिंकण्याची संधी आहे.

दि. 4 डिसेंबर 2020 पासून ही योजना लागू झालेली आहे. त्यामध्ये पेट्रोल किंवा डीझेल भरून ग्राहकांना कार जिंकण्याची संधी असेल. त्यासाठी फ़क़्त 400 रुपयांचे इंधन भरून एक कुपन मिळेल. एक्स्ट्राप्रीमियम आणि एक्स्ट्रामाइल हे इंधन भरणाऱ्यांनाही ही स्कीम लागू असेल.

त्यासाठी ग्राहकांना खूप काही जास्त करायचे नाही. पेट्रोल भरल्याचे प्रिंटेड बिल त्यासाठी आवश्यक आहे. ग्राहकांनी हे बिल घेऊन त्यावरील बिल नंबर आणि डीलर कोड यांचा एसएमएस पाठवायचा आहे. त्यासाठी  ‘डीलर कोड <space>बिल नंबर<space> बिलावरील रक्कम’ हा मेसेज  90521 55555 यावर पाठवायचा आहे. बिलावर 6 अंकी डीलर कोड असतो.

दि. 31 डिसेंबर 2020 या दिवशीच्या मध्यरात्रीपर्यंत ही स्कीम खुली आहे. एक ग्राहक एका मोबाईल नंबरवरून दिवसातून दोनवेळा यासाठी मेसेज पाठवू शकतो. मात्र, त्यासाठी बिल जपून ठेवावे लागणार आहे. बिल हरवल्यास किंवा त्याचे ईबिल उपलब्ध नसल्यास बक्षीस अजिबात मिळणार नाही.

‘भरो फ्यूल जीतो कार’ योजनेतील बक्षिसे अशी :

– एक एसयूवी (मेगा लकी ड्रॉ)
– चार कार (मेगा लकी ड्रॉ)
– 16 बाइक्स (मेगा लकी ड्रॉ)
– प्रत्येक आठवड्यात 25 विजेत्यांना 5 हजार रुपयांचे मोफत इंधन
– प्रतिदिन 100 एक्स एक्स्ट्रारिवार्ड्स मेंबर्स (एक्स्ट्रारिवार्ड्स प्रोग्राममधील सहभागी ग्राहक) यामधील विजेत्यांना 100 रुपये किमतीचे मोफत इंधन

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here