मोदी सरकारने आणली नवी योजना; पहा पीएम-वाणी योजनेचा काय होणार फायदा ते

देशभरात सध्या शेतकरी आंदोलनामुळे वातावरण तप्त आहे. अशावेळी शेतकरी आणि ग्रामीण भागाला आणखी एक नवी कोरी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट म्हणून दिली आहे. त्या योजनेचे नाव आहे पीएम-वाणी योजना.

होय, या योजनेमुळे ग्रामीण भागाला मोठा फायदा होणार असल्याचे मोदीजींनी म्हटले आहे. शेतकरी आंदोलकांना शांत करताना त्यांनी म्हटले आहे की, नव्या कृषी सुधारणा विधेयकामुळे देशामध्ये खासगी क्षेत्राची गुंतवणूक वाढेल. त्यामुळे स्टोरेज सिस्टीम सुधारेल. तसेच सर्वांना बाजारात समान संधी असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, औद्योगिक संस्था FICCI च्या 93 व्या वार्षिक बैठकीत मोदीजी बोलत होते. त्यांनी उद्योजकांना आवाहन केले की, सर्वांनी यासाठी मदत करताना ग्रामीण भागामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्यावे. पीएम-वाणी योजनेद्वारे ग्रामीण भागात बेस्ट इंटरनेट कनेक्टीव्हिटी देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी विशेष लक्ष द्यावे.

एकविसाव्या शतकात भारताचा ग्रामीण भाग कुठेही मागे नसेल. त्यासाठीची ही तयारी आहे. ग्रामीण उद्योजकांना पीएम-वाणी योजनेद्वारे मोठी मदत होईल, असीही त्यांनी म्हटले आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here