बापरे… ‘त्या’ सेना नेत्याकडे सापडले पाकिस्तानचे क्रेडिट कार्ड; उडाली मोठी खळबळ

मुंबई :

मागच्या महिन्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापा टाकला होता. त्यावेळी प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग सरनाईक यांच्या घरीही ईडीच्या पथकाने चौकशी केली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीला प्रताप सरनाईक यांच्यावर संशय आहे. अद्यापही ही चौकशी चालू असून आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे.  

CNN NEWS18 ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने जेव्हा छापा टाकला होता. त्यावेळी एक पाकिस्तानी क्रेडिट कार्ड आढळून आले होते. या क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता आहे. पण, हे कार्ड सिंथिया दाद्रस यांच्या नावाने आहे. 

टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सरनाईक यांचे मित्र अमित चांदोळे यांचीही ईडीने कसून चौकशी केली होती. नंतर कोर्टाने चांदोळे यांना तीन दिवसाची कोठडी सुनावली होती. दरम्यान सापडलेल्या या पाकिस्तानी क्रेडिट कार्डमुळे सरनाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हे कार्ड फेरम

फेयरमॉन्ट बँक, कॅलिफोर्निया इथून देण्यात आले आहे. ईडीने या क्रेडिट कार्डबद्दलची माहिती स्टेटमेंटची मागणी प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. तसंच ईडीने फेयरमॉन्ट बँकेकडेही याबद्दल माहिती मागितली आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here