महाविकास आघाडीला भाजपचे मोठे आव्हान; ‘त्या’निमित्ताने होणार राजकीय बळाची चाचपणी

पुढील वर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीसाठीची तयारी भाजपने जोरात केली आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आपले वर्चस्व अबाधित राखण्यासह त्यात आणखी भर टाकण्याची तयारीही टीम फडणवीस यांनी केली आहे. त्याला निमित्त ठरले आहे ते ग्रामपंचायत निवडणुकीचे.

होय, राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. परिणामी ज्या गावांमध्ये निवडणुका होणार आहेत आणि संबंधित तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे आहे. अशावेळी आपली पकड मजबूत ठेऊन पुढच्या निवडणुकीच्या तयारीसाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.

यापूर्वीच्या सर्व महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकीत शहरी आणि ग्रामीण भागात पाय पसरायला भाजपने सुरुवात केली होती. राज्यात सत्तेट असताना तर त्यांचीच मक्तेदारी निर्माण होतेय की काय असेच चित्र होते. दरम्यान राज्यात सत्ताबदल झाला असून त्यामुळे अनेक ग्रामपंचायत आता महाविकास आघाडीकडे अपोआप झुकल्या आहेत. त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यासाठी आता भाजप सरसावली आहे.

परिणामी यंदाची ग्रामपंचायत निवडणूक आणखी चुरशीने होण्याची शक्यता आहे. त्यातच सत्तेतील तिन्ही पक्षांची स्थानिक पातळीवर आघाडी अशक्य आहे. तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मनोमिलन न करता अशावेळी एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून असतील. परिणामी महाविकास आघाडीच्या तलुअक्स्तरिय नेत्यांची डोकेदुखी जाम वाढणार आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here