मोठी बातमी… भारताच्या ‘त्या’ पहिल्या स्वदेशी लसीला मानवी चाचण्यांसाठी मंजूरी

दिल्ली :

देशातील पहिली स्वदेशी एमआरएनए लसीला मानवी चाचण्यांसाठी मंजूर देण्यात आली आहे. पुण्यातील Gennova यांनी विकसित केलेल्या एमआरएनए लसीला फेज १/२ मानवी क्लिनिकल चाचण्या सुरू करण्यासाठी औषध नियामकांकडून मान्यता मिळाली आहे. जैवतंत्रज्ञान विभागाने शुक्रवारी ही माहिती दिली आहे. एमआरएनए लस रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण करण्यासाठी पारंपारिक मॉडेल वापरत नाही. त्याऐवजी ते विषाणूच्या कृत्रिम आरएनएद्वारे शरीरात प्रथिने तयार करण्यासाठी मॉलिक्यूलर निर्देश देतात. शरीर त्याचा वापर व्हायरस प्रोटीन तयार करण्यासाठी करते आणि शरीरास रोगाविरूद्ध रोगप्रतिकारक रिस्पॉन्सही निर्माण करते.

फायनान्शियल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, साथीच्या आजाराशी लढण्यासाठी एमआरएनए-आधारित लस वैज्ञानिकदृष्ट्या एक चांगला पर्याय आहे कारण ती खूप वेगाने विकसित होते. एमआरएनए लस सुरक्षित मानली जाते कारण ती संसर्गजन्य नसते. या लसीचे निकाल/परिणाम देखील चांगले येतात असे मानले जाते. याव्यतिरिक्त, एमआरएनए लस पूर्णपणे कृत्रिम आहे. म्हणून, ही लस कमी खर्चात तयार केली जाऊ शकते. आणि त्यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी दिली जाऊ शकते.

Gennova यांनी अमेरिकेच्या सिएटलमधील HDT बायोटेक कॉर्पोरेशनबरोबर करारात एकत्र काम करून mRNA वैक्सीन कैंडिडेट विकसित केला आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here