आगबबो… पेट्रोलने केला कहर, गाठला ऐतिहासिक उच्चांक; वाचा का वाढताहेत इंधनाचे भाव

मुंबई :

वाढत्या महागाईमुळे तुमच्या खिशावरील भार वाढलेला असताना अजून एक मोठी बातमी आली आहे. तुमच्या खिशावर अजून भार घेण्यासाठी तयार राहा कारण आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. परिणामी बहुतांश शहरांमध्ये दराच्या आकड्यानं नव्वदी ओलांडली आहे.

मुंबईत सध्या पेट्राेलचे दर ९०.३४ रुपये प्रतिलिटर तर डिझेलचेदर ८०.४७ रुपये आहेत. डिझेलचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर आहेत. पेट्राेलचे दर ४ ऑक्टाेबर, २०१८च्या उच्चांकी पातळीवर आले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे देशात इंधनाचे दरही वाढले आहेत. नोव्हेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या दोन्ही मोठ्या करारांमध्ये 27 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोना लस लवकरच आल्याची बातमी कच्च्या तेलाच्या किंमतीं वाढवणारी ठरली. राज्यात शु्क्रवारी नांदेडमध्ये सर्वाधिक ९२.६९ रुपये प्रति लिटर एवढे पेट्राेलचे दर झाले आहेत, तर अनेक शहरांमध्ये पेट्राेलचे दर ९० रुपयांपेक्षा जास्त असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एवढेच नाही तर येणाऱ्या काही दिवसात पुन्हा इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here