तर डॉक्टरांना होणार 1 कोटींचा दंड; पहा सरकारने नेमका काय केलाय नियम

सध्या करोनाच्या कालावधीत डॉक्टर म्हणजे करोना योद्धे आहेत. अशावेळी डॉक्टरांना धक्का देणारी आणि सार्वजनिक आरोग्य सेवा आणखी सक्षम करणारा निर्णय उत्तरप्रदेश सरकारने घेतला आहे. ज्याद्वारे डॉक्टरांनी नियमांची पायमल्ली केल्यास त्यांना थेट 1 कोटी रुपयांचा मोठा दंड द्यावा लागणार आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये पोस्ट ग्रज्युएट डिग्री करणाऱ्या सर्व डॉक्टरांना पुढील किमान 10 वर्षे सरकारी सेवेत असावे लागेल. अशा पद्धतीने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला हातभार न लावणाऱ्या डॉक्टरांना बाहेर पडताना थेट 1 कोटी रुपये इतका मोठा दंड द्यावा लागणार आहे.

कोणत्याही डॉक्टरांनी पदव्युत्तर कोर्सला प्रवेश घेऊन मध्येच प्रवेश रद्द केला तर पुढील 3 वर्षे त्यांना पुन्हा प्रवेश मिळणार नाही. तसेच चिकित्सा करणाऱ्या सर्व डॉक्टरांना पदवी झाल्यावर तातडीने नोकरीला रुजू व्हावे लागेल. पदवी कोर्स करताना एखादी पदविका करण्याचीही मुभा डॉक्टरांना देण्यात आलेली आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here