मुंबई :
अडीच दशकांपूर्वी जेव्हा मुंबईतील अंडरवर्ल्ड दहशत शिगेला पोहोचली होती तेव्हा डी कंपनीचा छोटा शकील एक आयडिया करून सगळ्या खबरी जाणून घेत होता. तो पत्रकार म्हणून आपल्या एका पंटरला मुंबई पोलिस मुख्यालयात पाठवत असे. या पंटरला अंडरवर्ल्डमध्ये एसटीडी म्हणून ओळखले जायचे. मंगळवारी रात्री दक्षिण मुंबईत एसटीडीचे त्याच्याच घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
या पंटरला एसटीडी हे नाव पडले कारण तो मुंबईची प्रत्येक बातमी एसटीडी बूथवरून दाऊदला (अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम) देत असे. त्या काळात अंडरवर्ल्डमध्ये मोबाइल कॉलिंग सुरू झालेले नव्हते. विश्वासार्ह सूत्रांचे म्हणणे आहे की या एसटीडीची आई दाऊदच्या बहिणींना कुराण शिकवत असे.
या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊदच्या ‘एसटीडी’ने मुंबईतील एका छोट्या वर्तमानपत्राचा आयकार्ड घेतले होते. पत्रकार संस्थेत काम करण्यासाठी त्याकाळी खूप पगार नव्हते. त्या काळी आयकार्ड देणार्या संपादकाला दरमहा 25000 रुपये ‘एसटीडी’ पुरवायचा, असा दावा आणि खुलासा एसटीडीने केला होता. मात्र पोलिस या दाव्याचा ऐविडेंस उपलब्ध करु शकले नाहीत.
एसटीडी त्या वेळी पोलिस मुख्यालयात येणा सर्व पत्रकारांना प्रेस कक्षाबाहेर चहा देत असत जेणेकरून ते आपले चांगले मित्र व्हावेत आणि मग या पत्रकारांच्या माध्यमातून सर्व आतली माहिती मिळत राहील.
विशेष बाब अनेक वर्ष एकत्र असूनही कोणताच पत्रकार या एसटीडीचा डाव समजू शकला नाही. पण त्या दिवसांत पोलिसांच्या दालनात बसलेला एक शिपायाला संशय आला. आणि तिथून एसटीडीची गेम फिरली. एसटीडीच्या हालचालींवर लक्ष ठेवले गेले आणि अखेर त्याला अटक करण्यात आली.
पुढे काही दिवसांनी अंडरवर्ल्ड विरूद्ध मोठ्या ऑपरेशनसाठी या शिपायाला शौर्य पुरस्कार देखील मिळाला. या एसटीडीला काही महिन्यांनंतर बेल मिळाली. विशेष बाब म्हणजे हा एसटीडी आता पोलिसांचा खास माणूस बनला. नंतरच्या काळात दाऊदच्या माणसांची सगळी माहिती तो पोलिसांना देऊ लागला.
संपादन : स्वप्नील पवार
- धक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन
- ब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
- गाडी चालवणार्यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड
- राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती
- खुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस