‘त्या’ बाबतीत Facebook ही पडले मागे; बंदी घातलेल्या ‘त्या’ अॅपने रचला नवा रेकॉर्ड

मुंबई :

भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने डिजिटल स्ट्राईक केला आणि चीनच्या अनेक अॅपवर बंदी घातली. विशेष बाब म्हणजे बंदी घातलेल्या अॅपमधील अनेक अॅप प्रचंड लोकप्रिय होते. आता एक मोठा रेकॉर्ड समोर आला असून त्यात एका बंदी घातलेल्या अॅपने बाजी मारली आहे. आणि जगभरात लोकप्रिय असणार्‍या फेसबुक अॅपलाही मागे टाकले आहे. २०२० या वर्षात टिकटॉक अॅप सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेलं अॅप ठरलं आहे.

App Annie हा अहवाल समोर आणला आहे.  App Annie कडून दरवर्षी डिसेंबर महिन्यात संपूर्ण वर्षाभरातील अॅप्सच्या कामगिरीचा लेखाजोखा प्रसिद्ध केला जातो. यावर्षीच्या या अहवालात दिलेल्या माहितीप्रमाने, ‘टिकटॉक’ अॅपने सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या अॅप्सच्या यादीत तीन स्थानांची मजल मारली आणि अव्वल स्थान गाठलं आहे. तर फेसबुक दुसऱ्या क्रमांकावर आहे.  

पहिले 5 अॅप :-

  1. टिकटॉक
  2. फेसबुक
  3. व्हॉट्सअॅप 
  4. झूम 
  5. इन्स्टाग्राम

यात विशेष बाब म्हणजे या वर्षीच्या टॉप-५ अॅप्समध्ये चार अॅप्स तर फेसबुकच्याच मालकीचे आहेत. तर सहाव्या क्रमांकावर असणारे अॅपही फेसबुकचेच आहे. सहाव्या क्रमांकावर फेसबुकच्याच मेसेंजर अॅपचा बोलबाला आहे. 

गुगलच्या Google Meet अॅपचा सातव्या क्रमांकावर समावेश आहे. त्यापाठोपाठ स्नॅपचॅट, टेलिग्राम आणि लाइकी यांचा नंबर लागतो. जानेवारी २०२० ते नोव्हेंबर २०२० मध्ये डाउनलोड्सच्या आधारावर ही संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस अॅप स्टोअरच्या माध्यमातून ही माहिती गोळा करण्यात आली आहे.

संपादन : स्वप्नील कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here