कांद्याच्या उत्पादनाचे गणित यंदा अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांनी पुरते फसले आहे. पावसामुळे कांदा खराब झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आणि आता सरकारने कांद्याचे भाव पडण्याचे प्रयत्न केल्याने या नगदी पिकाचे भाव घटले आहेत. त्यातच आयातीमुळे कांदा उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने इराण या देशातून ६०० टन कांद्यांची आयात केली आहे. हा कांदा आपल्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. परिणामी कांद्याच्या भाववाढीला फ़क़्त लगाम बसला नसून भाव कोसळत आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
कृषी सुधारणा विधेयकावरून देशभरात रणकंदन सुरू आहे. शेतकऱ्यांनी हे विधेयक कॉर्पोरेट धार्जिणे असल्याचे म्हटले आहे. तर, मोदी सरकार आणि भाजपने हे शेतकरी हिताचे असल्याचे दावे तोडले आहेत. मात्र, त्याचवेळी कांद्याचे भाव पडण्याचे कर्तव्य सरकारी यंत्रणा पार पाडीत आहे. त्यामुळे सरकारची कथनी आणि करणी यामध्ये मुलभूत फरक असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे कांद्याचे भाव पडले आहेत.
सध्या महाराष्ट्र राज्यातील बाजारपेठेत कांद्याचे भाव सरासरी 17 ते 25 रुपये किलोच्या दरम्यान खाली आलेले आहेत. 80 रुपये किलोचा भाव मिळणारा कांदा थेट 20 टक्के इतक्या भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
- ब्रेकिंग : आता राज्यात पुन्हा होणार 5000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका; ‘या’ कालावधीत उडणार बार
- मोठी बातमी… राज्यात पुन्हा होणार निवडणुका; ‘यावेळी’ होणार 27 झेडपी, 20 महापालिका, 625 नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणूकांचा धमाका
- जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल आहे चांगले; वाचा महत्वाची माहिती
- घरच्याघरी बनवा ‘हे’ तेल आणि वेदनेपासून मिळवा मुक्ती
- व्हॉट्सअॅपवर मोदी सरकारची कठोर कारवाई; वाचा, नेमकं काय केलंय सरकारने