पायात पैंजण घालण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरु आहे. अगदी वयस्कर स्रीपासून लहान मुलींपर्यंत, शहरापासून खेड्यापर्यंत, लुगड्यावर असून नाहीतर जीन्सवर पैंजण वापरलेच जातात.लुक जुना असो नवा, त्याला परिपूर्णता भेटते ती पायात पैंजण घातल्यामुळे. लहानपणापासून बाळांनासुद्धा आवर्जून पैंजण घातले जातात. पैंजण हे सौंदर्य तर वाढवतातच तसेच ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. आज आपण आम्ही तुम्हाला पैंजण घातल्याने मिळणाऱ्या फायद्यांविषयी सांगणार आहोत.
- बहुतांश स्रिया चांदीचे पैंजण घालतात. चांदीच्या शीतलतेमुळे शरीरातील उष्णताही कमी होते.
- पैंजण हे इन्फर्टिलिटी आणि हार्मोंससंबंधी समस्यांपासून सुटका मिळवून देण्यात मदत होते. परिणामी महिलांना पीरियड्समध्ये होणाऱ्या वेदना कमी करण्यात मदत करते.
- चांदीच्या पैंजण पायाला वारंवार घासल्यामुळे पायाची हाडं मजबूत होतात.
- पायातील पैंजणामुळे महिलांच्या शरीराचं ब्लड सर्क्युलेशनही योग्य होतं. जेणेकरून एनर्जेटीक म्हणजे उर्जावान वाटते.
- पैंजणांच्या आवाजाने घरातील नकारात्मक उर्जैच्या जागी सकारात्मक उर्जा निर्माण होते, असा म्हटलं जातं.
संपादन : संचिता कदम
- गाडी चालवणार्यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड
- राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती
- खुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस
- राज्यातील ‘या’ शहरात घडली घटना : लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास; थेट आयसीयूमध्ये केले दाखल
- आता काँग्रेसही झाली आक्रमक; ‘मांडीला मांडी लावून बसलेले’ म्हणत ‘त्यांच्यावर’ साधला निशाणा