आजवर चहा पिण्याचे तोटे नेहमीच वाचले असतील; आता फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित

आजवर आपण सगळे चहा पिण्याचे तोटे वाचत आलो आहोत. आपल्या आश्चर्य वाटेल पण चहा पिण्याचे खरोखरच काही फायदे आहेत. जे महत्वाचे आणि आरोग्यादायीसुद्धा आहेत. म्हणूनच आंम्ही तुम्हाला आज चहा पिण्याचे आश्चर्यचकित करणारे फायदे सांगणार आहोत.

  • जे लोक रोज 2 कप चहा पितात, ते अन्य लोकांच्या तुलनेत कमी आजारी पडतात. चहा तुमच्या शरीराला रोगांशी लढण्यासाठी सक्षम बनवते. चहा पिणार्‍यांना सर्दी, ताप, खोकला जास्त होत नाही.
  • संशोधकांनी म्हटले आहे की, दररोज 2 कप चहा प्यायल्याने महिलांमध्ये ओवेरियन कॅन्सरचा धोका खुप कमी होतो. याशिवाय चहा प्यायल्याने स्ट्रेस लेव्हलसुद्धा कमी होते.
  • साखर न टाकलेला चहा किंवा गुळाचा चहा प्यायला सुरूवात करा. यामुळे मेटाबॉलिज्म अ‍ॅक्टिव होते, आणि शरीरातील जास्तीची चरबी कमी होते. परिणामी वजनही कमी होते.
  • मुलांनी दूध प्यायलाच हवे, पण केवळ दूध न देता त्यांना पचनतंत्र मजबूत करण्यासाठी कमी साखरेचा चहा एक कप चहा द्या. त्यामळे रोगप्रतिकारशक्तीत वाढ होते.
  • एक 1 कप कॉफीमध्ये 150 मि.ग्रॅम कॅफीन आढळते, तर चहाच्या 1 कपात केवळ 30-40 टक्के कॅफीन असते. कॉफीचे जास्त सेवन केल्यास छातीत जळजळ होऊ शकते, यामुळे कॉफीपेक्षा चहा पिणे कधीही चांगले.
  • दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात, परंतु नुकतेच अमेरिकेत एक संशोधन करण्यात आले, यामध्ये म्हटले आहे की, जे लोक केवळ दूध पितात, चहा पित नाहीत, त्यांची हाडे चहा पिणार्‍यांच्या तुलनते कमजोर असतात. मजबूत हाडांसाठी चहा आणि दूध दोन्हीचे सेवन करणे आवश्यक आहे.
  • चहात फ्लोराईड आणि टॅनिन असते, जर तुम्ही दिवसात 2 वेळा कमी साखरेचा चहा प्यायला तर तुमचे दात चमकू लागतात.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here