काँग्रेसला सल्ला देत संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया; जर शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष झाले तर तर…

मुंबई :

कालपासून प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान सोनिया गांधींनी याला होकार दिला असल्याचेही समजत होते. मात्र  पवारांनी या बातम्यात तथ्य नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी या पार्श्वभूमीवर आपले मत व्यक्त केले आहे.

जर शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष झाले तर आम्हाला आनंदच आहे. यूपीएला मजबूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. ते म्हणाले की, शरद पवार हे जर यूपीएचे अध्यक्ष झाले तर ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण, पवार यांनी स्पष्ट केले आहे की, या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही. याबाबत अजून कोणता प्रस्ताव आला नाही तर त्याबाबत बोलणे चुकीचं आहे.

पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसला सल्लाही दिला आहे. ते म्हणाले की, काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विरोधीपक्षही मिळवता आले नाही, हेही सत्य आहे. सध्या राजकारणाच्या परिस्थितीत सर्व विरोधी पक्षांना मजबुतीचे निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे विरोक्षी पक्षांनी एकत्र येऊन यूपीएला मजबूत केले पाहिजे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. देशात एक मजबूत फ्रंट हवा आहे, याच नेतृत्व कोण करणार ही एक मोठी गोष्ट आहे.

संपादन : स्वप्नील पवार   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here