मुंबई :
सध्या हिवाळा जोरदार जाणवत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी अधून मधून येणारा पाऊस नुकसानदायी ठरतो आहे. दरम्यान दिनांक 11, 12 आणि 13 डिसेंबरच्या दरम्यान धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केलाय.
आजपासून तीन दिवस उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघर जिल्ह्यात काही ठिकणी अवकाळी पावसाची हजेरी तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण, पालघर तालुक्यातील, बोईसर, पालघर, माहीम, केळवे, सफाळे, सातपाटी, भागात पाऊस सुरू झाला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात (Maharashtra) अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण (Cloudy weather) पाहायला मिळत आहे. येत्या एक ते दोन दिवसांत ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातल्या अनेक भागांत आज (शुक्रवार) अचानक पावसाने हजरे लावली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुढच्या 3 तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
संपादन : स्वप्नील पवार
- आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत ‘या’ माजी उपमुख्यमंत्र्यांना धक्का; बारामतीकरांचे बारीक लक्ष भोवणार
- तृतीयपंथी असल्याने अर्ज नाकारलेल्या अंजली पाटलांचा निकाल आला समोर; वाचा, काय आहे निकाल
- अण्णांच्या राळेगणसिद्धीत घडला ‘हा’ प्रकार; ‘त्यांनी’ मारली बाजी
- महाविकास आघाडीतील तीनही पक्ष ‘या’ ग्रामपंचायतीसाठी आपसात भिडले; मात्र घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार
- आमदार मामाला गावातून झटका; माजी आमदार भाचीने केले ‘असे’ परिवर्तन