तर फेसबुकला विकावं लागेल Instagram आणि Whatsapp; बसणार मोठा झटका, घडला ‘हा’ प्रकार

वॉशिंग्टन :

सध्या समाजमाध्यमांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. दिवसेंदिवस नेटकरी सोशल मीडियावर घडणार्‍या विविध घटनांवरून त्यांच्यावर तक्रारी दाखल करत आहेत. अशातच आता फेसबुक एक मोठ्या संकटात सापडले आहे. फेसबुकविरोधात अमेरिकन फेडरल ट्रेड कमिशन आणि अमेरिकेतील जवळपास प्रत्येक राज्याने खटला दाखल केला आहे.

हा खटला इतका मोठा आहे की जर अतीतटीच्या या केसमध्ये फेसबुकला पराभव स्वीकारावा लागला तर फेसबुक कंपनीला त्यांच्या मालकीचे Whatsapp आणि Instagram विकावं लागेल.

काय आहे प्रकरण :-  

अमेरिकन राज्यांनी फेसबुक या सोशल मीडिया कंपनीवर आरोप केला आहे की, नव्या आणि तरुण स्पर्धकांना मार्केटमधील शर्यतीपासून दूर ठेवण्यासाठी फेसबुकने ‘बाय अ‍ॅन्ड ब्यूरी’  धोरण वापरले आहे.

याविषयी बोलताना फेसबुकच्या प्रतींनिधींनी स्पष्ट केले आहे की, कंपनी न्यायालयात खटला लढण्यास तयार आहे, आम्ही त्या दिवसाची वाट पाहतोय. आम्ही न्यायालयात पूर्ण आत्मविश्वासाने पुरावे सादर करणार आहोत, आम्ही इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपसोबत आहोत. आम्ही या दोन्ही कंपन्यांना अधिक मोठं केलं आहे, तसेच योग्यतेच्या आधारावर आम्ही मार्केटमध्ये टिकून आहोत.

फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्राम जेव्हापासून फेसबुकचा एक भाग बनलं आहे, तेव्हापासून या अॅपचा अधिक विकास झाला आहे. कंपनीने कित्येक पटींनी नवे युजर्स मिळवले आहेत. आमच्या एकत्र येण्याचे ग्राहकांचा फायदाच झाला आहे. तसेच आमच्यामुळे इंस्टाग्राम अधिकच विश्वसनिय बनलं आहे. तसेच कंपनीसमोरील अनेक अडथळे आपोआप दूर झाले आहेत. मात्र आम्ही पुढे जात असताना इतर स्टार्टअप पटरीवरुन उतरले.

इंस्टाग्रामप्रमाणे व्हॉट्सअॅप फेसबुकचा भाग झाल्यापासून युजर्सना त्याचा फायदाच झाला आहे. जगभरातील युजर्सना आम्ही एसएमएसऐवजी एक नवा आणि मोठा प्लॅटफॉर्म दिला आहे. मोबाईल ऑपरेटर कंपन्या एसएमएसच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात शुल्क आकारत होत्या. परंतु व्हॉट्सअॅपने त्यावर लगाम बसवला, अशीही माहिती फेसबुककडून मिळाली आहे.   

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here