मुंबई :
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. यात देशभरातील जवळपास 40 शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. आता माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. शरद पवार यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची दिल्लीत भेटही घेतली आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही यांनीही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
अजित पवार यांनी म्हटले की, नवा कृषी कायदा शेतकर्यांच्या फायद्याचा आहे, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. परंतु हे खरं असतं तर, कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकरी बांधव रस्त्यावर उतरला नसता. आदरणीय शरद पवार साहेब कालच राष्ट्रपतींना भेटले. त्यावेळी साहेबांनी या विधेयकावर काय केलं पाहिजे, हे सविस्तर सांगितलं.
पुढे बोलताना पवार यांनी केंद्र सरकारची भूमिका कशी असावी, याबाबत सल्लाही दिला आहे. पवार म्हणाले की, केंद्रातील वरिष्ठ मंत्री शेतकर्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत आहेत, परंतु तोडगा अजून निघत नाहीये. केंद्र सरकार विधेयकात काही प्रमाणात बदल करणार असल्याचं सांगत आहे, मात्र याबाबत स्पष्टता नाही. मंत्रिमंडळातील आमचे सहकारी राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या शेतकरी बांधवांसोबत आंदोलनाच्या दिशेने रवाना झाले आहेत. केंद्राने हटवादीपणाची भूमिका बाजूला ठेवून समंजस भूमिका घेतली पाहिजे.
संपादन : स्वप्नील पवार
- धक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन
- ब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
- गाडी चालवणार्यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड
- राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती
- खुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस