सोन्याच्या दरात आज पुन्हा झाली घसरण; वाचा, काय आहेत ताजे दर

दिल्ली :

आता उत्सवाचा हंगाम सुरु असून आता सोने खरेदी वाढली आहे, असे चित्र आहे. अशातच सोने-चांदीचे दर कमी- जास्त होताना दिसत आहेत. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. अशातच आज देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीचे भाव घसरले आहेत. आज पुन्हा सोन्याच्या किंमतीत घसरण झाली असून  दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) 534 रुपये प्रति तोळांंनी कमी झाले आहेत.

कोरोनालसीबाबत येणाऱ्या सकारात्मक वृत्तांमुळे लोकांचे लक्ष सुरक्षित गुंतवणुकीवरून हटले आहे. विशेष म्हणजे लोकांनी आता सोन्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे सोन्याची मागणी कमी झाली परिणामी बाजारावर परिणाम होऊन किंमतही कमी झाली आहे. दरम्यान आज चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. एक किलो चांदीच्या दरात (Silver Price Today) 628 रुपयांची घसरण झाली आहे. याआधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 49,186 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. तर चांदीचे दर 63,339 रुपये प्रति किलो होते. जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचांदीच्या दरात घसरण झाल्याने भारतात सोन्याचांदीचे दर कमी झाले आहेत.

एचडीएफसी सिक्‍योरिटीजचे सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते आज सलग चौथ्या दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे सोन्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमती कमी झाल्याने देशांतर्गत बाजारातही किंमती उतरल्या आहेत. याशिवाय कोरोना व्हॅक्सिनबाबत सकारात्मक बातम्या समोर आल्याने सोन्याच्या किंमतीवरील दबाव वाढत आहे. त्यांनी असे म्हटले की अमेरिकेत स्टिम्यूलस पॅकेजची घोषणा झाली आणि डॉलरचे मुल्य कमी झाले तर सोन्याचे भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here