पेट्रोल-डिझेलच्या दरावरून सामान्य नागरिकांना दिलासा! वाचा, काय आहेत नवे दर

गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर वाढत आहेत.  तेल कंपन्यांनी केलेल्या वाढीमुळे तसेच कच्च्या तेलाच्या मागणीमुळे दिवसेंदिवस दर वाढताना दिसत होते. सातत्याने वाढणार्‍या दरामुळे लोक अधिकच आर्थिक संकटात सापडले होते. दरम्यान आता तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान Organization of the Petroleum Exporting Countries कडून मिळालेल्या माहितीनुसार, ओपेकने दोन दिवस आधीच असा निर्णय घेतला आहे की ते कच्च्या तेलाचं उत्पादन दररोज पाच लाख बॅरलने वाढवणार आहेत. याचा आपल्याला फायदा मिळेल आणि आमचा अंदाज असा आहे की दर स्थीर होतील. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात तेव्हा इथे (भारतात) देखील (इंधनाचे) दर वाढतात.

अशा आहेत देशातील मुख्य शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती :-

दिल्ली- पेट्रोल 83.71 रुपये आणि 73.87 रुपये लीटर

मुंबई- पेट्रोलचे दर 90.34 रुपये आणि डिझल 80.51 रुपये लीटर

कोलकाता- पेट्रोल 85.19 रुपये आणि डिझल 77.44 रुपये लीटर

चेन्नई- पेट्रोल 86.51 रुपये आणि डिझलचे दर 79.21 रुपये लीटर

नोएडा- पेट्रोल 83.67 रुपये आणि 74.29 रुपये लीटर

लखनऊ- पेट्रोल 83.59 रुपये आणि 74.21 रुपये लीटर

पाटणा- पेट्रोल 86.25 रुपये आणि 79.04 रुपये लीटर

चंदीगड- पेट्रोल 80.59 रुपये आणि 73.61 रुपये लीटर

बेंगळुरु- पेट्रोल 86.51 रुपये आणि 78.31 रुपये लीटर

अहमदाबाद- पेट्रोल 81.09 रुपये आणि 79.53 रुपये लीटर

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here