आयुष्यात ध्येय गाठायचे असेल तर हे विचार नक्कीच वाचा…

१) तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

२) छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

३) कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

४) कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही,
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

५) पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो

६) अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

७) जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

८) जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं ना.
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु करण्याची.

९) पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही
दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत
म्हणजे जीवन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here