अस्सल इरसाल किस्से; वाचा की… हसून हसून लोटपोट व्हाल

१) स्थळ पुणे:-
बायको: अहो ऐकलं कां?
आपले लग्न लावून देणारे भटजी वारले.. नवरा: एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते.!

२) वडील: अरे, एक काळ असा होता,
की मी पाच रुपयांत किराणासामान दूध, पाव
आणि अंडी घेऊन यायचो.
मुलगा: आता ते शक्य नाही, बाबा!
आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय.

३) एका मुलीने,
आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मॅसेज सेंट केला,
आपलं लग्न होवू शकत नाही कारण माझं
लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरले आहे..
मुलगा मॅसेज वाचुन खुप
दुःखी होतो आणि रडायला लागतो..
२ मिनिटांनंतर त्या मुलाला मॅसेज येतो,
सॉरी. सॉरी!
चुकून तुम्हाला हा मॅसेज सेंट झाला.!

४) बंडयाचा बाप त्याला सांगत असतो,
कितीही झालं तरी मुलापेक्षा बापच जास्त हुशार असतो,
बंडया: अच्छा, मग सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला?
बाप: ग्राहम बेलने,
बंडया: मग त्याच्या बापाने का नाही लावला.

५) बायको: अहो एक सांगू का,
पण मारणार तर नाही ना?
नवरा: हो सांग ना,
बायको: मी गरोदर आहे,
नवरा: अगं ही तर आनंदाची बातमी आहे,
मग तू एवढी घाबरतेस का?
बायको: कॉलेजला असतांना ही बातमी बाबांना सांगितली होती,
तेव्हा त्यांनी मारलं होतं.

६) बायको: मी ड्राइवरला नोकरी वरुन काढत आहे,
कारण आज दूसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे.
नवरा: Darling Please, त्याला अजून एक चान्स दे ना.!

७) बायको: माझी मैत्रीण येणार आहे,
दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा..
नवरा: बरं.. पण वचन दे,
माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील.!

८) नवरा बायकोचं भांडण चालु असतं..
नवरा: तु स्व:तला आवर नाहीतर
माझ्या मधला जनावर बाहेर येईल.
बायको: हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय.!

९) एक मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करते.
आणि ३ दिवसांनी परत घरी येते,
वडील(रागाने): आता काय हवंय?
मुलगी: बारीक पिनचा चार्जर..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here