व. पु. काळे यांचे मजेशीर आणि उपहासात्मक कोट्स; नक्कीच वाचा

  1. स्टोव्हची जातच लहरी पुरूषाप्रमाणे. शेगड्या बिचाऱ्या गरीब असतात. एव्हर रेडी! स्टोव्हचं तसं नाही. त्याची मिजास सांभाळली तरच पेटणार.
  2. पुरुषाला प्रत्येक देखणी स्त्री आवडते हा बायकांचा चुकीचा समज आहे. आकर्षण आणि प्रेम या फार वेगवेगळ्या अवस्था आहेत
  3. Identity Cards सारखी विनोदी गोष्ट या जगात दुसरी काही नसेल. आपण आहोत कसे हे त्यांना हवं असतं. त्याऐवजी आपण दिसतो कसे ते पाहून ते ओळखतात
  4. माणूस निराळा वागतोय तो कामातून गेला असं आपण पटकन बोलतो. पण तसं नसतं या सगळ्याचा अर्थ तो फक्त आपल्याला हवा तसा वागत नाही एवढाच असतो
  5. राहण्यासाठी अक्षता लागत नाहीत तर अंडरस्टँडिंग लागतं.
  6. सुंदर मुलीसाठी झुरायला फार अक्कल लागत नाही.
  7. माणसांचे चेहरे कसे असतात? तर भारताने जागतिक बँकेकडून काढलेलेल कर्ज त्यांना त्यांच्या बेसिकमधून फेडायचंय असे
  8. पापणीच्या आत झालेली पुटकुळी फक्त डोळ्यांंना समजते, म्हणून कोणी डोळा फोडतो काय?
  9. बायकोपेक्षा मैत्रीण जास्त विश्वास ठेवते म्हणून क्षमा करण्याची ताकद बायकोपेक्षा मैत्रिणीत जास्त असते.
  10. वैयक्तिक टीकास्पद सवयी समजासाठी सोडायच्या असतात. तेव्हा सभ्यतेच्या मर्यादा इतरांसाठी पाळायच्या नसतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here