सावधान ! देशातील 70 लाख डेबिट-क्रेडिट कार्डधारकांचा डेटा लीक; ‘असा’ होईल परिणाम

दिल्ली :

दिवसेंदिवस आर्थिक बाबींविषयक माहिती लिक होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा घटनांमधून अनेक मोठे आर्थिक घोटाळेही घडलेले आहेत. आता अशातच एक मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे.  देशातील 70 लाख भारतीयांचा वैयक्तिक डेटा डार्क वेबवर लीक झाला असून क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहितीही सार्वजनिक झळ असल्याची माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे.

इंटरनेट सिक्युरिटी रिसर्चर्सचे सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या लीक झालेल्या डेटामध्ये फोन नंबर, ई-मेल्स, कंपनीचे नाव आणि उत्पन्नाची माहिती आहे. लीक झालेला डेटा 2 जीबी असून युजर्संचा मोबाईल प्रकार आणि मोबाईल अलर्ट सुरू आहे की नाही, यासंदर्भातही माहिती आहे. हा डेटा 2010 ते 2019 या कालावधीतील असून तो हॅकर्ससाठी अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो.

पुढे बोलताना राजहरिया यांनी संगितले की, लीक झालेला हा डेटा आर्थिक बाबींशी संबधित असल्याने हॅकर्संसाठी अतिशय मौल्यावान ठरु शकतो. कारण, पिशिंग किंवा इतर हल्ल्यांसाठी या वैयक्तिक संपर्काचा वापर केला जाऊ शकतो. लीक झालेल्या डेटामध्ये कार्ड नंबर नाहीत. हा डेटा थर्ड पार्टीकडून लीक झाल्याची शक्यता आहे. उदाहर्णार्थ सांगायचे झाल्यास, बँकांसोबत क्रेडिट आणि डेबिट कार्ड देण्यासंदर्भात करार केलेल्या कंपन्यांकडून असे होण्याची शक्यता आहे.

लीक झालेल्या 70 लाख युजर्संचा डेटा वैध आहे की नाही याची पडताळणी झाली नसली तरी इंटरनेट संशोधकाने काही वापरकर्त्यांचा डेटा तपासला असून बऱ्यापैकी वैध असल्याचे जाणवले आहे. “मला वाटते की एखाद्याने हा डेटा किंवा लिंक्स डार्क वेबवर विकल्यानंतर तो सार्वजनिक झाला. आर्थिक डेटा इंटरनेटवरील सर्वात महाग डेटा आहे’, असे राजशेखर यांनी सांगतिलंयसुमारे 5 लाख कार्ड धारकांचा पॅन क्रमांकही या डेटामध्ये लीक झाल्याचे संशोधकानी म्हटलंय.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here