असे बनवा ‘उरलेल्या भाताचे पकोडे’; रेसिपी वाचण्यासाठी क्लिक करा

उरलेल्या भाताचे करायचे काय? असा प्रश्न सगळ्यांसमोर असतो. आता या भाताला सकाळी तुम्ही गरम करून खात असाल. पण उरलेल्या भाताचा अजून एक चविष्ट पदार्थ करता येऊ शकतो. आणि तो लहान मुलांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा आहे. आम्ही आपल्याला एक नवीन पदार्थ सांगणार आहोत आणि त्याची रेसिपिसुद्धा तर जाणून घ्या. ‘उरलेल्या भाताचे पकोडे’ची रेसिपी. हा पदार्थ ट्राय करा, आपल्याला नक्की आवडेल.

साहित्य घ्या मंडळीहो..

 1. 1 वाटी उरलेला भात
 2. अर्धी वाटी बेसन
 3. 1 बारीक कांदा
 4. चवीनुसार मीठ
 5. मॅगी मसाला
 6. लाल तिखट
 7. लिंबाचा रस
 8. हळद
 9. कोथंबीर
 10. 2 मिरच्या
 11. जिरे

हे साहित्य घेतले असेल तर वाट कशाची बघताय …. बनवायला सुरुवात करा की .

 1. वर उल्लेख केलेले सर्व साहित्य भातामध्ये मिसळून घ्यावे. सर्व साहित्य एकजीव करून घ्यावे.
 2. सर्व एकजीव झाल्यावर छोटे छोटे गोळे बनवून घ्यावे. (तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊ शकता.)
 3. कढईमध्ये तेल तापवून घ्यायचे. तेल तापल्यावर तयार केलेले गोळे गरम तेलामध्ये कुरकुरीत तळून घ्यावेत. तयार झालेले पकोडे कोणत्याही चटणी सोबत अथवा सॉस सोबत खाऊ करू शकता.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here