शिक्षण क्षेत्रातील ‘ती’ 6 हजार पदे भरणार, भरती प्रक्रिया सुरू होणार; राज्य शिक्षणमंत्र्यांची घोषणा

मुंबई :

सध्या कोरोनाच्या साथीमुळे विविध क्षेत्रातील अनेक पदांसाठीच्या अनेक भरत्या थांबविण्यात आल्या होत्या. आता हळूहळू विविध भरत्या होण्याची चिन्हे दिसत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील ‘शिक्षण सेवक’ पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यात लवकरच ‘शिक्षण सेवक’ पदभरती प्रक्रिया सुरू होणार असून त्या माध्यमातून तब्बल 6 हजार पदे भरली जाणार आहेत. अनेकांना ही संधि उपलब्ध झाली आहे. या भरतीमुळे अनेकांना दिलासाही मिळाला आहे. याविषयी बोलताना राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, ‘उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे पवित्र पोर्टलदवारे उर्वरीत सुमारे 6 हजार पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होत आहे.’

कोविड-19 या संसर्गजन्य रोगामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांवर वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने घालण्यात आलेल्या पदभरती बंदीतून ‘शिक्षण सेवक’ पदभरती प्रक्रिया वगळ्यात आली आहे. अशी माहिती राज्य शासनाच्या कक्ष अधिकाऱ्याकडून राज्याच्या शिक्षण आयुक्तांना एका शासन आदेशातून देण्यात आली आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here