अशी बनवा टेस्टी, स्वदिष्ट चिकन बिर्याणी; वाचा आणि नक्कीच ट्राय करा

तुम्ही नॉनव्हेज आणि त्यातल्या त्यात बिर्याणी लव्हर असाल तर तर बिर्याणी खाण्यासाठीच हा हिवाळ्याचा मोसम आहे मंडळींहो.. . बिर्याणी म्हटलं की प्रत्येक नॉनव्हेजप्रेमीची जीभ वळवळते आणि तोंडाला पाणी सुटतं. आपल्या सर्व नॉनव्हेज प्रेमींसाठी आम्ही आज खास रेसिपी घेऊन आलो आहोत. ‘टेस्टी चिकन बिर्याणी.

टेस्टी, स्वदिष्ट चिकन बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य घ्या मंडळींहो.

 1. 1 किलो बासमती तांदूळ
 2. 1 1/2 किलो चिकन
 3. 1/4 किलो कांदे
 4. 1/4 किलो टोमॅटो
 5. 3 टेबल स्पून आलं लसूण पेस्ट
 6. 1 टेबल स्पून जिरं
 7. 3 टेबल स्पून बर्यानी मसाला
 8. 1 जुडी कोथिंबीर
 9. 1/2 जुडी पुदिना
 10. 100 ग्राम दही
 11. 2 टेबल स्पून लिंबूरस
 12. 2 टेबल स्पून लाल तिखट
 13. 1 टी स्पून हळद
 14. 4 तमालपत्र
 15. 2 मसाला वेलची
 16. 2 हिरवी वेलची
 17. 1 टी स्पून मिरी
 18. 5/6 लवंग
 19. 1 इंच दालचिनी तुकडा
 20. चवीनुसार मीठ

ही बिर्याणी स्पेशल आहे म्हणूनच हे बनवण्यासाठी पद्धत पण स्पेशल आहे. थोडा वेळ लागेल. पण बिर्याणी खाल्ल्यावर मजा आ जायेगा.
साहित्य रेडी असेल तर करा की सुरुवात बनवायला….

 1. कांदा उभा चिरून त्याला तळून घ्यावं. चिकन स्वच्छ करून त्याला हळद, मीठ, लाल तिखट, बिर्याणी मसाला, तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर, खडा मसाला आणि दही घालून मुरवत ठेवायचं.
 2. दुसऱ्या भांड्यात तांदळाच्या 3 पट पाणी उकळत ठेवावं, त्यात खडा मसाला, हळद, मीठ, तेल घालून उकळी काढून घ्यावी. त्यात भिजवलेले तांदूळ टाकून भात अर्धा कच्चा शिजवून घ्यावा. भात चाळणीत गाळून घ्यावा.
 3. एका भांड्यात शिजवलेलं चिकन आणि भाताचे थर लावून त्याला कमी आचेवर 20 मिनिट शिजायला ठेवावे. आपली बिर्याणी तय्यार.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here