असा बनवा टेस्टी आणि हेल्दी ‘खजूर मिल्क शेक’; वाचा आणि नक्कीच ट्राय करा

बऱ्याचदा आपल्याला चमचमीत पदार्थांचे सेवन करायची सवय लागलेली असते. आजच्या घडीला जगात बहुतांश चमचमीत पदार्थ हे अजिबातच पौष्टिक नसतात. म्हणूनच आज आम्ही आपल्याला एक टेस्टी आणि आरोग्यदायी ‘खजूर मिल्क शेक’ची रेसिपी सांगणार आहोत.

‘खजूर मिल्क शेक’ बनवण्यासाठी साहित्य घ्या मंडळीहो.

  1. 100 ग्रॅम खजूर
  2. 4-5 बदाम
  3. 4-5 काजू
  4. 250 मिली दुध
  5. 1 टीस्पून तूप

साहित्य घेतले असेल तर करा बनवायला सुरुवात.

  1. प्रथम खजूर घ्या, त्याच्या बिया काढून टाका.
  2. एका भांड्यात तूप घालून बदाम, काजू परतून घ्या. तुपात खजूरचे कप परतून घ्या.
  3. आता त्यात दूध घाला. मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. स्मूथ बारीक करा. (साखर घालयाची गरज नाही)
  4. आता त्यात काजू, बदाम घाला.
  5. मस्त खजूर मिल्कशेक तयार आहे.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here