धक्कादायक : नीतू कपूर, वरूण धवननंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यालाही कोरोनाची लागण; ‘तिथून’ झाला प्रसार

मुंबई :

पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. संपूर्ण काळजी घेऊनही सिनेक्षेत्रात कोरोना फैलावत असल्याचे चित्र आहे. ‘जुग-जुग जियो’ या सिनेमाच्या चित्रीकरना दरम्यान अनेकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे चित्र समोर आले होते. सुरूवातीला चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वी वृत्त आले होते की, वरुण धवन, नीतू कपूर यांना कोरोना झाला आहे. आता अभिनेता मनीष पॉललाही कोरोना झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान तनाज इराणी या छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीला कोरोना झाल्याचे समजते आहे.ही माहिती तिने इंस्टाग्रामवर दिली आहे. तसेच ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री दिव्या भटनागरचे निधन झाले आहे. त्यामुळे आज सिनेइंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.

कोरोनाचा रिपोर्ट हाती आल्यानंतर मनीष पॉल शूटिंगचे लोकेशन सोडून मुंबईत आला आहे. त्याने मुंबईतील घरी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. सध्या मनीष पॉल किंवा त्याच्या टीमकडून याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि कियारा आडवाणी ‘जुग-जुग जियो’ चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाच्या सेटवर अनेक जन बाधित झाल्याने चित्रपटाच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here