थंडीचा असा झाला फळांच्या बाजारावर परिणाम; वाचा ताजे बाजारभाव

पुणे :

थंडीच्या दिवसात काही थंड आणि रसदार असणार्‍या फळांची मागणी हळूहळू कमी होऊ लागते परिणामी बाजारात फळांचे दरही कमी होऊ लागतात. दरम्यान आता वातावरणात थंडी वाढू लागल्याने मोसंबी, संत्री, कलिंगड, खरबूज, सीताफळाच्या दरात बदल झाला आहे. या फळांच्या दरात घसरण झाली असून बाजारात मागणीही कमी झाली आहे.

मागच्या 1-2 आठवड्यात बोरे आणि लिंबाच्या दरात मोठी घसरण झाली होती. आता मात्र बोरे आणि लिंबाच्या भावात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. आवकच्या तुलनेत मागणी वाढल्यामुळे फळांचे दर वाढतात. तेच बोरे आणि लिंबाच्या बाबतीत घडल्यामुळे मार्केट यार्डात रविवारी बोरे आणि लिंबाच्या भावात वाढ झाली आहे.

आवकच्या तुलनेत मागणी वाढल्यामुळे मार्केट यार्डात रविवारी बोरे आणि लिंबाच्या भावात वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे अननस, संत्रा, मोसंबी, सिताफळ, खरबूज, पपई, चिकू आणि डाळिंबांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते.

असे आहेत फळांचे ताजे बाजारभाव : 

लिंबे (प्रति गोणी) : 100-150, अननस (डझन) : 70- 270, मोसंबी : (3 डझन) : 180-450, (4 डझन ) : 60-190, संत्रा : (10 किलो) : 100-300, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 30-200, गणेश : 10-50, आरक्ता 10- 60. कलिंगड : 5-8, खरबूज : 10-25, पपई : 5-12, चिकू : 100-500, सिताफळ 10-80

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here