हे पिव्वर येडछाप विनोदी किस्से वाचा आणि पोटभर हसा.

1) गणू: पप्पा जरा कारची चावी दया ना. कॉलेज ला जायचंय..
पप्पा: कॉलेज ला जायला कारची काय गरज??
गणू: काय नाय पप्पा. २० लाखाच्या गाडीतून जाऊन जरा हवा करायचीय..
पप्पा: हे घे २० रुपये. ५० लाखाच्या बसमधून जा,
म्हणजे वादळ येईल वादळ.

2) आई घाबरून म्हणाली: बाळा तु लवकर घरी ये,
सुनबाईला पेरेलिसिसचा अटॅक आलाय..
तोंड वाकडं, डोळे वर आणि मान वळलीय बघ..
मुलगा: आई तु घाबरू नकोस शांत रहा,
ती सेल्फी काढत असेल.

3) बायको: तुम्ही सारखं सारखं माझ्या माहेरच्यांबद्दल का बोलता?
जे काय बोलायचं ते मला बोला..
नवरा: हे बघ टीव्ही खराब होतो, तेव्हा आपण टीव्ही ला काही बोलतो का?
शिव्या तर कंपनीलाच देतो ना.

4) बायकोचा राग आला तर तो गिळा,
नाहीतर ‘गिळायला’ मिळणार नाही.

5) ३ मुंग्यांना १ केक दिसतो..
पहिली जाते आणि केक खाते..
दुसरी पण जाऊन खाते..
तिसरी नाही खात.
का ??
ती म्हणते: शिईईईई.
केक ला मुंग्या लागल्यात!

6) असे काही नियम, जे न्यूटन सुद्धा सांगू शकला नाही..
नियम 1:
जर ब्रेड तुमच्या हातातून सुटला तर तो जमिनीवर त्याच बाजूला पडतो,
ज्या बाजूला “जाम” किव्हा “बटर” लावलेले असते..
हळहळ.
नियम 2:
जेव्हा तुमचे हात ग्रीस किव्हा पिठाने भरलेले असतात,
तेव्हाच तुमच्या नाकाला अचानक “खाज” सुरु होते..
कासावीस.

7) महाभयंकर जोक:
इंग्लिश माणुस आजीबाईला –
What Is Your Name??
आजीबाई – महा काही नेम नाही भाऊ.
आज हाय उद्या नाय!!!

8) पाऊस जास्त असल्यामुळे कृपया मुलींनी,
शक्यतो घराबाहेर पडु नये..
कारण पावसामुळे,
‘MAKE UP’ उतरला तर,
‘BREAK UP’ होऊ शकतो.

9) एक मुलगी: मी घटस्फोट घेणार आहे,
दुसरी: अगं.. आत्ताच तर तुझं लग्न झालं,
आणि नवरा तर कब्बडी चॅम्पियन आहे ना,
मुलगी: तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे,
नुसता टच करतो आणी पळुन जातो.

10) एका गावात शुटींग होते,
मुलगी: आई गावात शुटींग होत आहे..
आई: जाऊ नको तिथे..
आई: हीरो कोण आहे?
मुलगी: ईमरान हाश्मी..
आई: अगं बाई! मग आजीलाही आत घे.

11) मी एका हॉटेल मध्ये एकटा बसलो होतो,
तिथे एका मुलीने जवळ येऊन विचारले,
‘तू सिंगल आहेस का?’
मी मनातल्या मनात खुश होऊन बोललो, ‘हो.’
माझ्या समोरची रिकामी खुर्ची
घेऊन गेली ना राव ती.!

12) माझा एक मित्र काल कट्ट्यावर बसल्यावर,
सुजल्या चेहऱ्याने सांगत होता..
संध्याकाळी बायकोने त्याला
खुप म्हणजे खूपच धुतले..
कारण अगदी साधंसच होतं,
त्याने उदबत्ती लावतांना बायकोकडे पाहत,
फक्त एवढंच म्हटलं..

“घरातली पीडा बाहेर जावो,
बाहेरची लक्ष्मी घरात येवो!”

13) शिक्षक : सांग माकडाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?
गण्या : मंकी..
शिक्षक : खरं सांग पुस्तकात बघून बोललास ना..
गण्या :- नाही सर देवा शपथ.. मी तुमच्याकडे बघून बोललो.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here