केंद्र सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा परिणाम : सर्वसामान्यांना दिलासा, शेतकऱ्यांना फटका; ‘त्या’ दैनंदिन वस्तूचे भाव 25 टक्क्यांनी घसरले

पुणे :

दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. दैनंदिन वापरतील इंधन, तेल अशा अनेक गोष्टींचे भाव वाढत आहेत. अशातच सर्वसामान्यांना दिलासा तर शेतकऱ्यांना झटका  देणारी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जवळपास सर्वच डाळींच्या दरात 25 टक्के घसरण झाली आहे.

केंद्र सरकारने आयात धोरणात बदल केल्यामुळे हा डाळीच्या दरातील परिणाम समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे एका बाजूला आंदोलन करत असलेले शेतकरी अजूनच आर्थिक खोलीत रुतणार आहेत. कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गातून आता कुठे लोक स्थिरावत असताना महागाईमुळे नागरिक तर सर्वच अयोग्य भावामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.   

डाळीच्या पुरवठा आणि मागणीत बरीच तफावत निर्माण झाल्याने गेल्या काही महिन्यांमध्ये भाववाढ झाल्याचं दिसून आलं होतं. या भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने तुरीची आयात आणि नाफेडच्या साठ्यातून 3.6 लाख टन तूर खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला.  

दरम्यान, आयातीला प्रोत्साहन देण्यासाठी आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळेही डाळींच्या दरात घसरण झाल्याचं बोललं जात आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांतही डाळीचे दर कमी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता सर्वसामान्यांना नागरिकांना चिंता करण्याची काही गरज नाही अशी माहिती डाळीच्या व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे. 

असे आहे डाळींचे दर :-

– तुर डाळींच्या दरात प्रति किलो 20 ते 25 रुपयांची घसरण

– तुर डाळींचे दर कमी होऊन 50 ते 94 रुपये प्रति किलोवर

– चणा डाळीचे दर कमी होऊन 58 ते 64 रुपये किलोवर

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here