‘या’ औषधामुळे 24 तासांमध्ये बरा होणार कोरोनाबाधित; ‘हे’ जबरदस्त संशोधन आले समोर

दिल्ली :

देशभरात कोरोना लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी काय उपाय करता येतील, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अद्याप कोरोनावर लस आलेली नाही. तसेच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच आता संशोधकांनी एक नवीन दावा केला आहे. MK-4482/EIDD-2801 या औषधामुळे अवघ्या 24 तासात एखादा रुग्ण कोरोनामुक्त होऊ शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.

या औषधावर संशोधन करणाऱ्या संशोधकाचा असा दावा आहे कि, हे अँटी-व्हायरल औषध पूर्णपणे कोरोना नष्ट करू शकते. MK-4482/EIDD-2801 या औषधाला सोप्या भाषेत मोल्नुपीरावीर असेही म्हणतात.

पहिल्यांदाच कोरोनावर उपचार करण्यासाठी तोंडावाटे घेतले जाणारे औषध आणले जात आहे. कोरोनाच्या उपचारात MK-4482/EIDD-2801 गेम चेंजर असल्याचे सिद्ध होऊ शकते. जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या रिसर्च टीमने हे औषध शोधले आहे. हे औषध सुरुवातीच्या संशोधनात इन्फ्लूएन्झासारखा घातक फ्लू दूर करण्यात प्रभावी असल्याचे आढळल्यानंतर फेरेट मॉडेलच्या माध्यमातून SARS-CoV-2 चा संसर्ग रोखण्यासाठी यावर संशोधन करण्यात आले, अशी माहिती या अभ्यासाचे लेखक रिचर्ड प्लंपर यांनी दिली.

सदर रिसर्च जर्नल ऑफ नेचर मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रकाशित केला आहे. ज्यात म्हटले आहे की, कोरोना रूग्णांना फक्त संसर्ग पसरण्यापासूनच रोखत नाही तर पुढील गंभीर आजारांना मोल्नुपीरावीर प्रतिबंधित करू शकते.

संशोधनाचे सह-लेखक जोसेफ वॉल्फ यांनी याविषयी बोलताना सांगितले की, संक्रमित प्राण्यांसोबत ठेवलेल्या कोणत्याही निरोगी प्राण्यांमध्ये हा संसर्ग पसरला नाही. जर त्याच मार्गाने कोरोना संक्रमित रूग्णांवर मोल्नुपीरावीर औषधाचा वापर केला गेला, तर 24 तासांच्या आत रुग्णांमधील संसर्ग संपुष्टात येईल. MK-4482/EIDD-2801 ही कोरोनासंसर्गाविरूद्ध प्रगत टप्पा दुसऱ्या आणि तिसऱ्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here