थर्ड पार्टी अ‍ॅपला झटका : आता पैसे ट्रान्सफर करण्यासाठी द्यावा लागणार चार्ज, फक्त ‘या’ अ‍ॅपला लागू होणार नाही नियम

दिल्ली :

देश आर्थिक संकटातून जात असताना विविध आर्थिक नियम बदलले जात आहेत. बँक रोज विविध नियमांमध्ये झालेले बदल आपल्यासमोर आणत आहेत. आता अशातच नेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) ने एक नवीन नियम समोर आणला आहे. याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे.

 थर्ड पार्टी अॅपद्वारे युपीआय ट्रान्झेक्शनवर शुल्क लावले जाणार आहे. गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे, फोन पे सारख्या थर्ड पार्टी अॅपद्वारे जर कोणी युपीआय ट्रान्झेक्शन करणार असेल तर त्याला जादा चार्ज द्यावा लागणार आहे. NPCI ने थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सकडून चालवण्यात येणाऱ्या UPI पेमेंट सर्व्हिसमध्ये १ जानेवारी २०२१ पासून ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे. 

मात्र या नियमाचा परिणाम पेटीएमच्या ग्राहकांवर होणार नाही. पेटीएमला कोणतेही शुल्क लावले जाणार नाही.

थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सवर ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनपीसीआये हा निर्णय भविष्यात कुठल्याही थर्ड पार्टी अ‍ॅपची एकाधिकारशाही रोखण्यासाठी आणि त्याला आकाराच्या मनाने मिळणारे विशेष फायदे थांबवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. एसपीसीआयच्या या निर्णयामुळे आता UPI ट्रांझॅक्शनमध्ये आता कुठल्याही पेंमेंट अ‍ॅपची एकाधिकारशाही राहणार नाही. ३० टक्के कॅप निर्धारित करण्यात आल्याने आता गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे, फोनपे सारख्या कंपन्या यूपीआयअंतर्गत होणाऱ्या एकूण ट्रान्झॅक्शनमध्ये कमाल ३० टक्के ट्रान्झॅक्शनचीच तरतूद करू शकतील, अशी माहिती एनपीसीआयने दिली.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here