‘देश नही बिकने दुंगा’चा नारा देऊन विकल्या 121 सरकारी कंपन्या; वाचा किती मोठा वाटा आहे मोदींचा

सौगंध मुझे इस मिट्टी की, देश नही झुकने दुंगा.. देश नही बिकने दुंगा’ असे म्हणत सत्तासोपान चढलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी कंपन्या विकण्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात कंपन्या विकून मिळालेला पैसा एकूण सरकारी निर्गुंतवणूकीपेक्षा खूप मोठा आहे.

दैनिक भास्कर वृत्तपत्राने याबाबतचा स्पेशल रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, स्वातंत्र्याच्या पहिल्या 40 वर्षांमध्ये सरकारने अनेक मोठे प्रकल्प उभारले. मात्र, 1991 मध्ये देशात आर्थिक संकट आल्यावर सरकारी कंपन्यांचा हिस्सा विकण्यास सुरुवात झाली. त्याला आता 30 वर्षे होत आहेत. आतापर्यंत सर्व सरकारने मिळून 4.89 लाख कोटी रुपये इतक्या किमतीचा सरकारी वाटा विकला आहे. त्यातला मोदी सरकारचा शेअर खूप मोठा आहे.

पहिल्या 23 वर्षांमध्ये सरकारने जितक्या किमतीचा हिस्सा विकला त्यापेक्षाही मोठ्या वेगाने मोदी सरकारने सरकारी कंपन्या विकण्याचा सपाटा लावला आहे. मोदी यांच्या कार्यकाळात तब्बल 121 कंपन्यांचा हिस्सा किंवा संपूर्ण कंपन्या विकण्यात आलेल्या आहेत. मागील पावणे सात वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने 3.36 लाख कोटी रुपये इतक्या किमतीची सरकारी मालमत्ता खासगी कंपन्यांना विकली आहे.

निर्गुंतवणूक आणि हिस्सेदारी विकणे यातील भेद अजिबात लक्षात न घेता सरकारी कंपन्या खासगी उद्योजकांना देण्याचा सपाटा मोदी सरकारने लावलेला आहे. एकूण चित्र लक्षात घेता मोदी सरकारने बोलण्याच्या विपरीत कृती करून अर्थव्यवस्था मजबूत न करतानाच सरकारच्या वाट्याची मालमत्ता विकण्याचा खेळ चालवला आहे. इतके होऊनही देशभरात मोदी यांना मिळत असलेला पाठींबा लक्षात घेता पुढील काळात आणखी काही कंपन्या इतिहासजमा होण्याची किंवा खासगी उद्योजकांच्या खिशात जाण्याची शक्यता जास्त आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

मूळ बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : Narendra Modi Vs Congress Govt PSU Disinvestment: BPCL Privatization Latest News, Everything Know In Smiple Words | जो कहते थे- मैं देश नहीं बिकने दूंगा, उनकी ही सरकार में सबसे ज्यादा कंपनियों की हिस्सेदारी बिकी – Dainik Bhaskar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here