बिर्याणी म्हटले नॉनव्हेजप्रेमींचा फेवरेट विषय. बिर्याणी म्हटलं की प्रत्येक नॉनव्हेजप्रेमीची जीभ वळवळते आणि तोंडाला पाणी सुटतं. आपल्या सर्व नॉनव्हेज प्रेमींसाठी आम्ही आज खास रेसिपी घेऊन आलो आहोत. ‘नकाब-ए-बिर्याणी’ ही हॉटेलमध्ये मिळत नाही. म्हणून हा पदार्थ घरीच करून खा. आम्हाला खात्री आहे हा बिर्याणी प्रकार आपल्याला नक्कीच आवडेल.
तर साहित्य घ्या मंडळीहो….
चिकन साठी साहित्य :-
- 1 किलो चिकन
- २५० ग्राम दही
- 2 टेबल स्पून अद्रक लसूण पेस्ट
- 1 टेबल्स्पून बिर्याणी मसाला
- 1 टिस्पून तिखट
- 1 टीस्पून हळद
- 1 मोठ्या लिंबाचा रस
- 1 टेबल स्पून कोथिंबीर चिरलेली
- 1 टेबल स्पून पुदिन्याचे पाने
- 1 टेबल स्पून तूप
राईस बनवण्यासाठी साहित्य :-
- ५०० ग्राम बासमती तांदूळ
- 1 टीस्पून खडा मसाला
- 1 टीस्पून मीठ
- 1 टीस्पून तेल
- 1 लिटर पाणी
नकाब बनवण्यासाठी साहित्य :-
- 1 कप मैदा
- 1 टीस्पून मीठ
- 1 टीस्पून तेल
- गार्निशिंगसाठी साहित्य
- लाल खाण्याचा रंग
- पिवळा खाण्याचा रंग
- बारीक चिरून तळलेला कांदा
- कोथिंबीर
- पुदिन्याचे पाने
- केवडा पाणी
हे साहित्य घेतले असेल तर वाट कसली बघताय. लागा की बनवायला
- सर्वप्रथम चिकन घ्यावे.
त्यात दही, अद्रक लसूण पेस्ट, तिखट, हळद, बिर्याणी मसाला आणि तूप ॲड करावे.
मीठ टाकून चिकनला हे सर्व साहित्य छान चोपडून घ्यावे.
एक तास मॅरीनेशन करायला फ्रीजमध्ये ठेवावे.
मॅरीनेशन झाल्यानंतर त्याला डायरेक्ट एका कढई मध्ये शिजू द्यावे.
या चिकन मध्ये पाणी किंवा दुसरे साहित्य काहीच ऍड करू नये.
चिकन अर्धे शिजू द्यावे आणि बाजूला ठेवावे. - दुसरीकडे एका भांड्यात बासमती तांदूळ घ्यावे.
त्यात पाणी खडा मसाला मीठ आणि तेल ऍड करावे.
हे तांदूळ अर्धे शिजू द्यावे.
अर्धे शिजल्यानंतर त्यातले पूर्ण पाणी काढून टाकावे.
आणि भात एका मोकळ्या ताटावर पसरून ठेवावे. - एकीकडे कांदा बारीक लांब चिरून त्याला कुरकुरीत तळून घ्यावे.
- आता बिर्याणीचे सर्व साहित्य रेडी आहे.
एक मोठे भांडे घ्यावे.
त्यात आधी राईस टाकावा.
त्यावर चिकन, तळलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिन्याचे पाने टाकावे.
परत सेम प्रोसेस रिपीट करत परत भात आणि चिकनचे लेअर बनवत रहावी.
सर्वात वरती तळलेला कांदा पुदिन्याची पाने कोथिंबीर टाकावे.
वरून एक टीस्पून केवढा पाणी ॲड करावे.
केवडा पाणी पूर्ण पोर्शन ला कव्हर झाले पाहिजे.
आवडीनुसार लाल रंग आणि पिवळा रंग ऍड करावे.
या लेअर केलेल्या बिर्याणीला झाकून स्टीमींग द्यावे.
दहा मिनिटे शिजू द्यावे.
आपली बिर्याणी रेडी आहे. - नकात बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मैदा मीठ आणि तेल घ्यावे.
थोडे पाणी ऍड करून छान मळून घ्यावे.
या मैद्याच्या गोळ्याची मोठी पोळी लाटावी. - ही पोळी एका कढईमध्ये पसरवून ठेवावी.
त्यात बनलेली बिर्याणी अॅड करावी.
या बिर्याणीला पोळी ने पूर्णपणे पॅक करावे.
ही कढई ही प्रोसेस झाल्यानंतर गॅस वर हे ठेवावी. - हे पोळीचे पॅकेट दोन्ही साईड ने शेकून घ्यावे.
सर्व करताना तडका डाळ सोबत सर्व करावे.
आपली ‘नकाब-ए-बिर्याणी’ तय्यार ..
संपादन : संचिता कदम
- ‘या’ बँकेचा ग्राहकांना अलर्ट! 1 फेब्रुवारीपासून नाही काढता येणार ‘या’ ATM मधून पैसे
- फायद्याची माहिती : म्हणून महाराष्ट्रालाही गरज आहे भावांतर योजनेची; वाचा योजनेचे वैशिष्ट्ये
- ‘त्या’ ई-कॉमर्स वेबसाइटची भन्नाट ऑफर: अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत मिळतोय टीव्ही; स्मार्टफोनवरही 40% डिस्काउंट
- मोठी बातमी : पशूसंवर्धन मंत्र्याचे आव्हान; बर्ड फ्लूमुळे कोणी व्यक्ती दगावल्याचे दाखवून द्या आणि…
- म्हणून पंजाबी शेतकरी आहेत श्रीमंत; पहा कशासाठी नेमके त्यांचे आंदोलन चालू आहे ते